![]()
आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे होणाऱ्या यात्रेसाठी होणारी अतिरिक्त प्रवासी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड विभागातील प्रवाशांना पंढरपूरला जाण्यासाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध होणार आहे. यामध्ये गाडी क्रमांक 07631 नगरसुल – पंढरपूर ही विशेष रेल्वेगाडी ता. 24 जुलै रोजी नगरसोल येथून रात्री सात वाजता सुटणार आहे. सदर गाडी रोटेगाव, लासूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाष लातुररोड, लातूर, धाराशिव, बार्शी, कुर्डूवाडी मार्गे शनिवारी ता. 25 पंढरपूर येथे दुपारी 12 वाजून 50 मिनिटांनी पोहोचेल. तसेच गाडी क्रमांक 07632 पंढरपूर – जालना ही विशेष रेल्वे, शनिवारी ता. 25 रात्री दहावाजता पंढरपूर येथून सुटणार आहे. कुर्डुवाडी, बार्शी टाऊन, धाराशिव, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, गंगाखेड, परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर मार्गे जालना येथे रविवारी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 07633 आदिलाबाद – पंढरपूर-मिरज ही विशेष गाडी शुक्रवारी ता. 24 पहाटे पाच वाजता आदिलाबाद येथून सुटणार असून किनवट, बोधडी बुजरुग, सहस्त्रकुंड, हिमायतनगर, भोकर, मुदखेड, नांदेड, पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, हरंगुळ, धाराशिव, पांगरी, बार्शी टाऊन, कुर्डुवाडी, मोडनिंब, पंढरपूर येथे शनिवारी रात्री नऊ वाजून 40 मिनिटांनी पोहोचेल. तसेच पुढे सांगोला, जत रोड, कवठेमहांकाळ, आरग मार्गे मिरज येथे रात्री 11 वाजून 55 मिनिटांनी पोहोचेल. गाडी क्रमांक 07634 मिरज-पंढरपूर – आदिलाबाद ही विशेष गाडी शनिवारी ता. 25 मिरज येथून रात्री साडे नऊ वाजता सुटणार असून आरग, कवठे महांकाळ, जतरोड, सांगोला, पंढरपूर, मोडनिंब, कुर्डुवाडी, बार्शी टाऊन, पांगरी, धाराशिव, हरंगुळ, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, गंगाखेड, परभणी, पूर्णा, नांदेड, मुदखेड, भोकर, हिमायतनगर, सहस्त्रकुंड, किनवट मार्गे आदिलाबाद येथे रविवारी दुपारी 15.00 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 07635 अकोला – पंढरपूर ही विशेष रेल्वागाडी शुक्रवारी ता. 24 अकोला येथून सकाळी आकरा वाजता सुटणार आहे. वाशीम, हिंगोली, वसमत, पूर्णा, परणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, पानगाव, लातुर, उदगिर, भालकी, बिदर झहीराबाद, विकाराबाद, तांडूर, सेरम, चित्तापूर, वाडी, कलबुर्गी, सोलापूर, कुर्डुवाडी, मोडनिंब मार्गे पंढरपूर येथे शनिवारी 09.20 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 07636 पंढरपूर – अकोला शनिवार, 25 जुलै 2026 रोजी पंढरपूर येथून दुपारी 15.50 वाजता सुटेल आणि मोडनिंब, कुर्डुवाडी, सोलापूर, कलबुर्गी, वाडी, चित्तापूर, सेरम, तांदूर, विकाराबाद, झहीराबाद, बिदर, भालकी, उदगीर, लातूर रोड, पानगाव, परळी वैजनाथ, गंगाखेड, परभणी, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम मार्गे अकोला येथे रविवारी दुपारी पाच वाजून 50 मिनिटांनी पोहोचेल. दक्षिण मध्य रेल्वेने आषाढी एकादशी यात्रेसाठी प्रवाशांनी या विशेष रेल्वेगाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे
Source link
आषाढी वारी:दक्षिण मध्य रेल्वेकडून आषाढी एकादशी निमित्त विशेष रेल्वेगाड्या, वारकऱ्यांची सोय होणार