ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली. दिल्लीत सुरू असलेल्या सोनम वांगचु
.
राज ठाकरेंवर हल्लाबोल- ‘डबल ढोलकी थांबवा’
दिल्लीत नीट परीक्षेच्या गोंधळावर आणि पेपरफुटीवर सोनम वांगचुक उपोषण करत आहेत. यावर सदावर्ते म्हणाले, “वैद्यकीय परीक्षेच्या आधारावर विद्यार्थ्यांच्या भावनांचे इमोशनल ब्लॅकमेलिंग करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे. सोनम वांगचुक आणि राज ठाकरेंना सीबीआय आणि न्यायसंस्थेवर भरवसा नाही का? संविधानाच्या ‘राइट टू लाइफ’नुसार मरेपर्यंत उपोषण करता येत नाही. मग सोनम वांगचुक काय संविधानापेक्षा मोठे आहेत का?”
राज ठाकरेंच्या वांगचुक यांना दिलेल्या पाठिंब्यावर ते म्हणाले, “राज ठाकरेंना आता सोनम वांगचुकचा पुळका आला आहे. मग त्यांनीच जाऊन तिथे उपोषण करून दाखवावे, पण ‘विना ओढता’. राज ठाकरे आता वाजंत्री झाल्यासारखे ढोलकी वाजवत आहेत. ‘शेंबूड पुसता येईना आणि राजकारण करायला निघाला’, अशी त्यांची अवस्था आहे. त्यांनी डबल ढोलकी वाजवणे थांबवावे.”
‘धंदेवाईक मंत्री’ आणि पीपीपीचा घाट
एसटी महामंडळाच्या डेपोंच्या जागा पीपीपी तत्त्वावर खासगी विकासकांना देण्याच्या निर्णयावरून सदावर्ते यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना ‘धंदेवाईक मंत्री’ म्हटले. “एसटीचे डेपो हे दूधवाले, भाजीवाले आणि कष्टकऱ्यांसाठी आहेत. त्या जागा मॉल्स किंवा हॉटेल बांधण्यासाठी नाहीत. प्रताप सरनाईकांनी बिल्डरच्या डोळ्याने या जागांकडे बघू नये,” असा सज्जड दम त्यांनी दिला.
कष्टकऱ्यांचे पेन्शन थांबवले
“गेल्या 5 महिन्यांपासून प्रताप सरनाईक एसटी कर्मचाऱ्यांचे पेन्शन देऊ शकलेले नाहीत. ते एक ‘नापास मंत्री’ आहेत. त्यांनी एसटी कष्टकऱ्यांच्या भावनांशी खेळू नये. सर्व संघटनांनी आपले रुमाल बाजूला ठेवून या खाजगीकरणाविरोधात एकत्र यावे,” असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली.
उद्धव ठाकरेंना ‘रामरक्षा खरोखरच पाठ आहे का?’
अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या चोरीच्या निषेधार्थ उद्धव ठाकरे नागपुरात ‘रामरक्षा’ आंदोलन करणार आहेत. यावर बोलताना सदावर्ते म्हणाले, “उद्धव ठाकरेंची मुंबईतल्या कार्यक्रमात रामरक्षा म्हणताना भंबेरी उडाली होती. संजय राऊतांनी आधी उद्धव ठाकरेंची परीक्षा घ्यावी की त्यांची रामरक्षा खरोखरच पाठ आहे का? त्यानंतरच इतरांना (देवेंद्र फडणवीसांना) आमंत्रण द्यावे.” त्यांनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळाला ‘काळा आणि बेअक्कल काळ’ म्हटले, तर देवेंद्र फडणवीस यांचा काळ कायद्याचे राज्य मानणारा असल्याचे सांगितले.
संबंधित बातमी वाचा…
‘निवडणुकीत आश्वासनांची खैरात, नंतर तिजोरी रिकामी!:मोफत साडी योजना बंद केल्यावरून वडेट्टीवार आणि रोहिणी खडसेंचा सरकारवर घणाघात

राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून तब्बल 92 लाख महिलांचे अर्ज बाद झाल्याची माहिती समोर आलेली असतानाच, आता राज्य सरकारने गरीब आणि गरजू महिलांना मिळणारी ‘मोफत साडी वितरण योजना’ आर्थिक टंचाईचे कारण देत गुंडाळली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी महायुती सरकारवर अत्यंत सडकून टीका केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी