Headlines

अकोला-बडनेरा रेल्वेत छेडछाडीचा प्रकार:तरुणीने आरोपी तरुणाला बांगड्या भरवल्या, पावडर-लिपस्टिक लावत शिकवला धडा – VIDEO




अकोला-बडनेरा रेल्वेत छेड काढणाऱ्या एका तरुणाला तरुणीने ‘गांधीगिरी’ स्टाईलने चांगलाच धडा शिकवला. या धाडसी तरुणीने रेल्वे डब्यातच या रोड रोमियोच्या हातात चक्क बांगड्या भरल्या आणि त्याच्या ओठांवर लिपस्टिक लावली. या अनोख्या शिक्षेचा आणि तरुणीच्या धाडसाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमका प्रकार काय? शेगाववरून बडनेराकडे येणाऱ्या ‘भुसावळ-वर्धा’ ट्रेनमध्ये हा संतापजनक प्रकार घडला. गाडीत प्रवाशांची मोठी गर्दी असताना एका तरुणाने जाणीवपूर्वक एका तरुणीची छेड काढण्यास सुरुवात केली. सहसा अशा प्रसंगी महिला घाबरून गप्प बसतात, पण या तरुणीने तसे न करता प्रवाशांच्या मदतीने थेट त्याला जागेवरच जाब विचारला. अनोखी शिक्षा नेहमीप्रमाणे छेड काढणाऱ्याला केवळ चोप न देता, या तरुणीने त्याला आगळ्यावेगळ्या पद्धतीने त्याची जागा दाखवून दिली. तिने स्वतःच्या हातातील बांगड्या काढल्या आणि त्या तरुणाच्या हातात भरवल्या. एवढ्यावरच न थांबता, तिने त्याच्या गालावर आणि ओठांवर लाली (लिपस्टिक) लावून त्याचा प्रवासात ‘मेकअप’ केला. व्हिडीओ तुफान व्हायरल आतापर्यंत महिलांची छेड काढणाऱ्यांना मारहाण झाल्याचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. मात्र, या तरुणीने ज्या अनोख्या पद्धतीने या तरुणाची धिंड काढली, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. डब्यातील प्रवाशांनी काढलेला या घटनेचा व्हिडीओ आता इंटरनेटवर व्हायरल झाला असून महिलांच्या धाडसाला सलाम केला जात आहे. हेही वाचा.. संभाजीनगर-इचलकरंजी बसला भीषण आग:चालकाच्या प्रसंगावधानामुळे 38 प्रवाशांची सुखरूप सुटका छत्रपती संभाजीनगर–इचलकरंजी एसटी बसला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. बसमध्ये 38 प्रवासी प्रवास करत होते. मात्र चालकाचे प्रसंगावधान आणि बाजूने जाणाऱ्या कारमधील नागरिकांच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवाशांना वेळेत बसमधून बाहेर काढण्यात यश आले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. गोंदियात कुत्र्यांची दहशत:घराबाहेर उभ्या असलेल्या शाळकरी मुलीवर 5-6 मोकाट कुत्र्यांचा हल्ला, थरार सीसीटीव्हीत कैद गोंदिया शहरात एक अत्यंत धक्कादायक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. शाळेत जाण्यासाठी घराबाहेर उभ्या असलेल्या एका ७ वर्षीय चिमुकलीवर ५ ते ६ मोकाट कुत्र्यांनी अचानक हल्ला केला. सुदैवाने एका सतर्क शेजाऱ्याने वेळीच धाव घेतल्याने या मुलीचा जीव वाचला आहे. मात्र, या हल्ल्यामुळे चिमुकली प्रचंड दहशतीखाली असून, हा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *