Headlines

समस्या सुटणार:छत्रपती संभाजीनगरच्या नो नेटवर्क झोनमध्ये नळ कनेक्शन हवे… मग आधी प्रॉपर्टी टॅक्स भरा, मिसारवाडी, सातारा, देवळाई आणि नारेगावला प्राधान्य




छत्रपती संभाजीनगरच्या बहुचर्चित नवीन पाणीपुरवठा योजनेतून शहरात वाढीव पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे ‘नो नेटवर्क’ भागात याच महिन्यात नवीन नळजोडण्या देण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. मात्र, हे कनेक्शन मिळवण्यासाठी थकीत मालमत्ता कर (प्रॉपर्टी टॅक्स) भरणे बंधनकारक असेल, अशी माहिती मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी दिली. ज्या मालमत्तांना अद्याप कर लागू नाही, त्यांना ४८ तासांत तो लावून दिला जाईल. १०० एमएलडी पाणी उपलब्ध पहिल्या टप्प्यात १०० एमएलडी पाणी शहराला मिळेल. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) आणि जीव्हीपीआर कंपनीमार्फत जायकवाडीचे पाणी आणले जात आहे. नक्षत्रवाडीतून ११००, १५०० आणि २००० मिमी व्यासाच्या जलवाहिन्या टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. १५०० मिमीच्या वाहिनीचे टेस्टिंग आणि क्लीनिंग करून जुलैअखेरपर्यंत पुरवठा सुरू करण्याचे नियोजन आहे. तसेच जुन्या जलवाहिन्यांमधूनही अतिरिक्त पाणी दिले जाईल. मनपाने प्लंबर असोसिएशनसोबत ‘एसओपी’ निश्चित केली असून, अर्जासोबत कर भरल्याची पावती जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. या जलकुंभांवरून मिळणार पाणी गरवारे स्टेडियम (मिसारवाडी), हर्सूल डब्ल्यूटीपी, हरिसिद्धी माता, हरिओमनगर, नारेगाव, सुधाकरनगर, आमेरनगर, एजीपी पब्लिक स्कूल, नक्षत्रवाडी आणि हनुमान टेकडी. महापालिकेकडून तिजोरी भरण्यासाठी स्मार्ट खेळी नवीन नळजोडणी मोहिमेच्या निमित्ताने मनपाला पाणीपट्टी आणि मालमत्ता कराच्या रूपाने महसूल प्राप्त होईल. कनेक्शनसाठी टॅक्सची सक्ती केल्याने थकीत वसुली होईल. ज्या मालमत्तांना कर लागलेला नाही, त्यांना अवघ्या ४८ तासांत कर लावून देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. यामुळे मिळणाऱ्या करापोटी मनपाची तिजोरी मात्र नक्की भरणार आहे. एमजेपीचे ४५,५०० कनेक्शन पूर्ण शहरात एकूण ९० हजार नळ कनेक्शन देण्याचे एमजेपीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ४५ हजार ५०० कनेक्शन्स पूर्ण झाली आहेत. यापूर्वी रोड क्रॉसिंग आवश्यक असल्यास ५,३५१ रुपये आणि क्रॉसिंग नसल्यास ४,५७४ रुपये शुल्क निश्चित करण्यात आले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *