![]()
तोंडापूर प्रकल्पाच्या वरील बाजूस काही समाजकंटकांनी नदीपात्रात टाकलेले घातक रसायन पाण्यात मिसळल्याने हजारो मासे मृत पावले. हे मासे पाण्यात सडल्यामुळे धरणाला दुर्गंधीचा वेढा पडला होता. पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेऊन दोन दिवसांत ८ क्विंटल मृत मासे बाहेर काढले. वन्यजीव संवर्धक डॉ. संतोष पाटील यांनी जामनेर वनविभागाशी संपर्क साधला. त्यांनी आपले सहकारी भूषण कानडजे, कौस्तुभ जोशी, भगवान आढाव, मुन्ना भोई, ईश्वर बलांडे यांच्या मदतीने ८ क्विंटल मृत मासे उपसले आहेत. या संवेदनशील प्रकरणाचा ‘दिव्य मराठी’ने सातत्याने पाठपुरावा केला. वृत्त प्रसिद्ध होताच प्रशासकीय यंत्रणा हलली. डॉ. पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे अजिंठा डोंगरात घातक रसायने टाकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला. आतापर्यंत फर्दापूर ठाण्यात ४, पहूर येथे १ आणि सिल्लोड ग्रामीण ठाण्यात ६ अशा एकूण ११ जणांवर गुन्हे दाखल आहेत. मात्र, रसायनाचा मुख्य पुरवठादार अजूनही पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार आहे. ११ जणांवर गुन्हे, मुख्य आरोपी मात्र मोकाट
Source link
पर्यावरणप्रेमींचा पुढाकार:तोंडापूरच्या धरणामधून 8 क्विंटल मृत मासे 2 दिवसांत बाहेर काढले, विषारी रसायनामुळे हजारो मासे मृत्युमुखी