![]()
यवतमाळमध्ये ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या प्रेयसीचे लग्न ठरल्याच्या रागातून प्रियकराने तिच्या गळ्यावर चाकूने वार करत निर्घृण खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. प्रियकरानेही जॉगिंग ट्रॅकवर झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे शनिवारी पहाटे उघडकीस आले. इंदिरानगर परिसरातील वनसंपदा सोसायटीतील उद्यानाजवळ शुक्रवारी रात्री १०.३० वाजता वैष्णवी आवारे हिचा खून झाल्याचा प्रकार घडला होता. धक्कादायक बाब म्हणजे ज्या युवकासोबत तिचे लग्न ठरले होते, त्याला फोन करून संशयित साहिल अशोक लव्हारे याने लाईव्ह मर्डर कॉल ऐकवल्याचे तपासात निष्पन्न झाले. याबाबत गोपाल बैरागी (२८, रा. दत्त चौक, सिडको) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, बहिण ज्योती बैरागी हिची मैत्रिण दीपाली सोनवणे हिच्या सोबत मागील पंधरा दिवसांपासून वैष्णवी आवारे राहात होती. दीपाली आणि वैष्णवी या दोघी ज्योतीच्या घरी आल्या. दोघी बहिणीकडे सहा दिवस मुक्कामी राहिल्याने चांगली ओळख झाली. दीपालीने वैष्णवी ही चांगली मुलगी आहे. तिला आई-वडील नाहीत, आजी-आजोबा आहेत. वैष्णवीसोबत लग्नाची बोलणी सुरू होती. तिच्या आजी-आजोबांना याबाबत कल्पना दिली होती. लग्न ठरवताना वैष्णवीने तिचे आणि साहिल लाव्हारे (रा. उमरखेड, यवतमाळ) याच्यासोबत प्रेमसंबंध होते, आम्ही लिव्ह इनमध्ये उरमखेड येथे राहत असल्याचे सर्व खरी हकीकत सांगितली होती. तिच्या या प्रामाणिकपणामुळे तिच्यावर विश्वास वाढला. लग्न करण्याचे ठरवले. मात्र ही बाब साहिल यास समजली. तो फोन करून त्रास देत असल्याचे वैष्णवीने सांगीतले होते. तो १५ जुलैला नाशिकमध्ये आल्याची माहिती मिळाली. शनिवारी त्याने वैष्णवीला मारल्याचा लाईव्ह फोन ऐकवला.
Source link
नाशिकला प्रेयसीचा खून करत प्रियकराने केली आत्महत्या:संशयित साहिल लव्हारेचे यवतमाळवरून येत कृत्य