Headlines

सण-उत्सवांतील महाप्रसादावर आता FDA ची करडी नजर:तुकाराम मुंढेंकडून 'स्टँडिंग ऑर्डर्स फॉर ऑल फेस्टिव्हल्स' लागू; सणांचे तीन स्तरांत वर्गीकरण




सण-उत्सवांच्या काळात भाविकांना वाटल्या जाणाऱ्या महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाच्या गुणवत्तेवर आता अन्न आणि औषध प्रशासनाची करडी नजर असणार आहे. सणांच्या काळात होणारी अन्नातील भेसळ रोखण्यासाठी FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘स्टँडिंग ऑर्डर्स फॉर ऑल फेस्टिव्हल्स’ हा ऐतिहासिक आणि धर्मनिरपेक्ष निर्णय लागू केला आहे, ज्याअंतर्गत महाप्रसाद आणि अन्नदानाच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तपासणी केली जाणार आहे. सर्व धर्मीयांच्या सणांसाठी वर्षभराचा असा स्थायी आदेश लागू करण्याची भारताच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. सणांच्या काळात अन्नपदार्थांमधील वाढती भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने वार्षिक कॅलेंडर तयार केले असून, धडक कारवाईसाठी विशेष नियोजन केले आहे. सणांचे तीन स्तरांवर वर्गीकरण प्रथम श्रेणी (राज्यव्यापी सण): गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, ईद, नाताळ (ख्रिसमस) आणि नववर्ष पूर्वसंध्या. द्वितीय श्रेणी (प्रादेशिक सण): मकर संक्रांती, महाशिवरात्र, होळी, गुढीपाडवा, आषाढी व कार्तिक वारी, श्रावण महिना, जन्माष्टमी, दहीहंडी, कोजागिरी आणि गुरुनानक जयंती. तृतीय श्रेणी (स्थानिक सण): स्थानिक जत्रा, पालखी सोहळे आणि उरुस. चार टप्प्यांतील धडक कारवाई ही कारवाई सणाच्या 21 दिवस आधी सुरू होऊन सण संपल्यानंतर 30 दिवसांपर्यंत चालणार आहे. पहिला टप्पा (पूर्वतयारी): अतिधोकादायक (हाय-रिस्क) अन्नपदार्थांचे नकाशांकन, विशेष पथकांची नियुक्ती आणि प्रयोगशाळांना पूर्वकल्पना देणे. दुसरा टप्पा (नाका तपासणी): गिरण्या, घाऊक मंड्या आणि वाहतुकीवर करडी नजर ठेवणे, तसेच पहाटेच्या वेळी विशेष नाका तपासणी करणे. तिसरा टप्पा (सणाचा दिवस): सणाच्या दिवशी विशेष भरारी पथकांद्वारे प्रत्यक्ष ठिकाणी अचानक (सरप्राईज) तपासणी करणे. चौथा टप्पा (कायदेशीर कारवाई): दोषींवर खटले दाखल करणे आणि कारवाईचा सविस्तर अहवाल आयुक्तांकडे सादर करणे. ‘हाय रिस्क’ अन्नपदार्थांच्या तपासणीचे नियोजन उपवासाचे व दुग्धजन्य पदार्थ: भगर, साबुदाणा, राजगिरा यांचे आधीच नमुने घेणे आणि बुरशीजन्य पदार्थांवर बारकाईने लक्ष ठेवणे. मांस, पाणी आणि बर्फ: स्वच्छतेची पाहणी, शीत साखळी आणि अधिकृत कत्तलखान्यांची वैधता तपासणे. सजावट आणि खाद्यरंग: मिठाईवर लावला जाणारा चांदीचा वरख शुद्ध आहे की नाही याची खात्री करणे व खाद्यरंगांच्या प्रमाणाची तपासणी करणे. सणनिहाय विशेष तपासणी: अक्षय्य तृतीयेला फळे पिकवण्याच्या पद्धती, नाताळमध्ये बेकरी उत्पादने, तर रमजान आणि ईदच्या काळात विशेष अन्नाची तपासणी करणे. ‘झिरो टॉलरन्स’ धोरणांतर्गत कठोर कारवाई सण-उत्सवांच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होऊ नये यासाठी एफडीएकडून ई-कॉमर्स, आयात अन्नपदार्थ, बेकरी उत्पादने आणि पॅकबंद पाणी यांवर ‘झिरो टॉलरन्स’ धोरणांतर्गत कडक नजर ठेवली जाणार आहे. या ऐतिहासिक स्थायी आदेशामुळे आता प्रत्येक सणासाठी स्वतंत्र आदेश काढण्याची गरज संपुष्टात आली असून, हाच नियम वर्षभर लागू राहील. या मोहिमेअंतर्गत, सण संपल्यानंतर अवघ्या 14 दिवसांच्या आत आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दोषींवर थेट न्यायालयात खटले दाखल केले जातील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *