Headlines

संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन:प्रगतीच्या महामार्गावर वारकऱ्यांचा भक्तीचा जनसागर!




॥ ज्ञानियांचा राजा गुरू महाराव । म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसें ॥ हे विहंगम दृश्य आधुनिक चौपदरी महामार्ग आणि शतकानुशतके चालत आलेल्या ‘वारी’ परंपरेचा एक अद्भुत संगम दर्शवते. आळंदीहून पंढरीच्या दिशेने निघालेल्या संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करताच धर्मपुरी येथे 21 तोफांची सलामी आणि गुलाबपुष्पांच्या वर्षावात राजेशाही स्वागत करण्यात आले. हिरवा शालू नेसलेल्या निसर्गाच्या कुशीतून जाणारा शुभ्रवस्त्रधारी वारकऱ्यांचा हा जनसागर डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे. टाळ-मृदंगाचा गजर आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला. यंदा प्रशस्त महामार्गामुळे वारीची वाट अधिक सुकर झाली. पावसाच्या हलक्या सरींनी पंढरीच्या ओढीने वैष्णवांचा उत्साह अधिकच द्विगुणित केला आहे. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज सोलापूर जिल्ह्यामध्ये अकलूज | पुणे जिल्ह्यातील शेवटचा सराटी येथील मुक्काम आटोपून व दोन जिल्ह्याच्या सीमेवरील नीरेतील स्नान आटोपून जगद््गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यात जिल्हा व तालुका प्रशासानाबरोबरच अकलूज नगर परिषदेकडून स्वागत करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रवेशावेळी प्रशासनाकडून स्वागत करतण्यात येईल. यावेळी पालकमंत्री, जिल्हाधिकारी व अन्य अधिकारी उपस्थित राहतील. तर गांधी चौकातील स्वागताला माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व कुटुंगीय उपस्थित राहतील. त्या स्वागतानंतर सोहळा जुन्या मार्गाने विठ्ठल मंदिरात जाऊन विसावेल. महिला वारकऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली अकलूजमध्ये १८ ठिकाणी २१० सार्वजनिक तर पालखी तळासह १३ मुक्कामस्थळी एकूण १,२०० फिरत्या शौचालयांची व्यवस्था केली आहे. महिलांसाठी पाच ठिकाणी स्वतंत्र अंघोळीची सुविधा आहे. पालखी तळ व शहरातील एकूण ९२ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *