![]()
देशातील नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा गोरेगाव येथे सोमवारी ता. २० प्रतिकात्मक पुतळा दहन करणाऱ्या क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व पोलिसांत झटापट झाली. पोलिस पुतळा घेऊन पुढे तर कार्यरर्ते मागे असे चित्र पहावयास मिळाले. यावेळी कार्यकर्त्यांची घोषणाबाजी केली. नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीयशिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजिनामा द्यावा तसेच देशभरातील विद्यार्थ्यांची माफी मागावी यासह इतर मागण्यांसाठी जिल्हाभरात आंदोलन सुरु झाली आहे. याशिवाय दिल्ली येथे सुरु असलेल्या सोनम वांगचुंक यांच्या आंदोलनाला जिल्हाभरातून पाठिंबा मिळत असून वसमत, कळमनुरी येथे प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान, सोमवारी ता. 20 सकाळी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गोरेगाव येथे शिक्षण मंत्री प्रधान यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले. यावेळी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, प्रवीण मते, अशोक कावरखे, विठ्ठल वायचाळ, राहुल कावरखे, अमोल गिरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्राच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे गेल्या 20 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत. मात्र, इतक्या दिवसांनंतरही सरकारने आंदोलनाची दखल घेतली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसेच आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचाही निषेध व्यक्त करण्यात आला. या शिवाय हिंगोलीचे भुमीपूत्र अभिजीत दिपके यांच्यावरही दडपण आणले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी मंत्री प्रधान यांचा पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र गोरेगाव पोलिसांच्या पथकाने प्रतिकात्मक पुतळा हिसकावून पळ काढला. यावेळी पोलिस व कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. त्यानंतर प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये केंद्रीयशिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, नीट प्रकरणात आत्महत्या केलेल्या 20 विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना न्याय द्यावा तसेच त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी, अशी मागणी करण्यात आली
Source link
हिंगोलीत नीट पेपरफुटीचे तीव्र पडसाद:केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या पुतळा दहनावरून राडा, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते अन् पोलिसांत झटापट