![]()
रेल्वे प्रवाशांची लूट करणाऱ्या अवैध तिकीट दलालांवर मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने मोठा ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला आहे. माहितीच्या अधिकाराखाली (RTI) समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार, गेल्या ५ वर्षांत मध्य रेल्वेने तब्बल १,६७६ गुन्हे दाखल करत १० कोटी ५० लाखांहून अधिक रकमेची तिकिटे जप्त केली आहेत. विशेष म्हणजे या गैरकारभारात सामील असलेल्या ७ रेल्वे कर्मचाऱ्यांवरही प्रशासनाने कडक कारवाई केली आहे. RPF ची धडक कारवाई; साडेदहा कोटींची तिकिटे जप्त गेल्या पाच वर्षांतील आकडेवारीनुसार, मध्य रेल्वेच्या RPF ने तिकीट दलालीला आळा घालण्यासाठी अत्यंत कडक पावले उचलली आहेत. या धडक मोहिमेअंतर्गत तब्बल ९ कोटी ६२ लाख रुपयांची ई-तिकिटे आणि ८८ लाख ४९ हजार रुपयांची जेसीआर तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. एकूण जप्त केलेल्या तिकिटांची रक्कम १० कोटी ५० लाखांच्या घरात आहे. यावरून तिकीट दलालीचे जाळे किती मोठे होते, याचा अंदाज येतो. हजारो दलाल आणि एजंट्स गजाआड सणासुदीच्या किंवा सुट्ट्यांच्या काळात सामान्य प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळवणे कठीण जाते. याच गैरसोयीचा फायदा हे दलाल आणि अनधिकृत एजंट्स घेतात. मात्र, RPF ने अत्यंत गुप्तपणे आणि वेगाने तपास करत गेल्या ५ वर्षांत तब्बल १,६४१ दलाल आणि ४१० बेकायदेशीर एजंट्सना अटक करून गजाआड केले आहे. या कारवाईमुळे अवैध तिकीट विक्री करणाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ७ रेल्वे कर्मचारीही रडारवर या संपूर्ण तिकीट घोटाळ्यात केवळ बाहेरील दलालच नाही, तर घरभेदी म्हणून रेल्वेचे काही कर्मचारीही सामील असल्याचे उघडकीस आले आहे. तपासादरम्यान, या अवैध तिकीट विक्रीच्या साखळीमध्ये सहभाग आढळलेल्या ७ रेल्वे कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. आरपीएफच्या या सातत्यपूर्ण कारवाईमुळे सामान्य रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. हेही वाचा मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय:नीट आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 23 जुलैपासून 15 दिवस जमावबंदी लागू दिल्लीत ‘नीट’ पेपरफुटीविरोधात सुरू असलेल्या तीव्र आंदोलनाचे पडसाद आता मुंबईत उमटण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून आगामी २३ जुलै ते ६ ऑगस्ट या १५ दिवसांच्या कालावधीसाठी मुंबईत जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी एक परिपत्रक जारी करुन ही माहिती दिली. सविस्तर वाचा
Source link
रेल्वे तिकीट दलालांवर RPF चा सर्जिकल स्ट्राईक:5 वर्षांत 1676 गुन्हे दाखल, 10.50 कोटींची तिकिटे जप्त; 7 रेल्वे कर्मचाऱ्यांवरही कारवाई