Headlines

'हे लोकतंत्र आहे की मोदीतंत्र?':पंतप्रधान मोदींनी माफी मागावी- सचिन सावंत; विद्यार्थ्यांवरील हल्ल्यावरून काँग्रेस आक्रमक




काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या इतर खासदारांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाद्वारे पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी आक्रमक मागणी काँग्रेस नेत्यांकडून करण्यात येत असून, राजधानीत घडणाऱ्या या सर्व राजकीय घडामोडींवर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सचिन सावंत म्हणाले, बहिऱ्या सरकारचे कान उघडले पाहिजेत. ज्या पद्धतीने अमानुषपणे निष्पाप विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी ज्या पद्धतीने इलेक्ट्रिक शॉक दिले, विद्यार्थिनींचे कपडे फाडलेले दिसतात, ते पाहता नरेंद्र मोदी यांनी देशातील विद्यार्थ्यांची माफी मागायला हवी होती. आपल्या विद्यार्थ्यांवर, देशाच्या भविष्यावर न्याय मागतात म्हणून हल्ला करत आहात कारण ते न्याय मागत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती देशाला गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले होते. गुलामाप्रमाणे वागणूक सरकारकडून दिली जात आहे. हे लोकतंत्र आहे की मोदीतंत्र झालेले आहे? लोकशाहीची हत्या गेल्या 12 वर्षात हळूहळू करण्यात आली त्याचा परिणाम दिसत आहे, अशी टीका सावंत यांनी केली आहे. हे मोदींचे राज्य कधीपासून झाले? पुढे बोलताना सचिन सावंत म्हणाले, 20-21 दिवस सोनम वांगचुक उपोषणाला बसले आहेत, त्यांचा एक प्रतिनिधी जाऊ नये इतकी निष्ठूरता कशी आली. ही लोकशाही आहे. लोकांनी लोकांसाठी बनवलेले राज्य आहे, हे मोदींचे राज्य कधीपासून झाले? प्रत्येक सरकारने विनम्र असण्याची आवश्यकता आहे. जगाला लोकशाहीची आदर्श परंपरा घालून देणाऱ्या देशाची तुलना उत्तर कोरिया आणि चीनबरोबर करण्याची परिस्थिती आली असल्याचा आरोपही सावंत यांनी केला आहे. मोदी सरकार डरती हें पोलिस को आगे करती हें विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हणणाऱ्या सदाभाऊ खोत यांना लाज वाटली पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी कशा प्रकारची भाषा वापरली जात आहे. हे कडकनाथ घेऊन आले आहेत का? असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले, आंदोलकांमध्ये काही लोकांना घुसवायचं आणि जाणीवपूर्वक घोषणा द्यायला लावायच्या हे भाजपचे टूलकिट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, मोदींनी देशाची माफी मागावी यासाठी राहुल गांधी यांनी आंदोलन सुरू केले आहे. ‘मोदी सरकार डरती हें पोलिस को आगे करती हें’ अशी स्थिती असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे. पहिले लढे थे गोरोंसे अब लढेंगे चोरोंसे काँग्रेस पक्षानं इंग्रजांशी लढाई लढलेली आहे, पहिले लढे थे गोरोंसे अब लढेंगे चोरोंसे, असे म्हणत सचिन सावंत यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून नीटच्या प्रश्नावर आंदोलन सुरु करण्यात आली आहेत. लोक स्वत:हून बाहेर पडत आहेत आणि विरोध करत आहेत म्हणून राज्य सरकारने जमावबंदीचा आदेश दिला म्हणजे ते किती घाबरले आहेत, असेही सावंत यांनी म्हटले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *