Headlines

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तीव्र आंदोलन:विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने




छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत हे आंदोलन करण्यात आले. राज्यातील आणि देशातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी पक्षाने हा पवित्रा घेतला. आंदोलकांनी सरकारवर गंभीर आरोप केले. देशात अलीकडच्या काळात २० हून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच, शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनीही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर उपोषण केले. या गंभीर प्रश्नांकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यावेळी आंदोलकांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. इतक्या गंभीर घटना घडूनही नैतिक जबाबदारी न स्वीकारल्याबद्दल त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, असे ते म्हणाले. जनविरोधी आणि विद्यार्थीविरोधी धोरणे राबवणाऱ्या सरकारचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. युवक आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी हा लढा यापुढेही अविरत सुरू राहील, असा इशारा सरकारला देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरून हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहरातील व जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भीमराव हत्तिअंबीरे, माजी आमदार संजय वाघचौरे, शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन मुल्ला, प्रदेश सरचिटणीस प्रा. सलीम शेख, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वजीत चव्हाण, शहर कार्याध्यक्ष आशिष पवार, तालुकाध्यक्ष प्रसन्ना पाटील यांच्यासह अनेक प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *