Headlines

मनपा आयुक्तांच्या बंगल्यासमोर झाड कोसळले:दुचाकीस्वार जखमी, वाहन नादुरुस्त; दोन तास वाहतूक ठप्प




अमरावती मनपा आयुक्त डॉ. महेश गोंदावले यांच्या सरकारी बंगल्यासमोर सोमवारी दुपारी एका झाडाची मोठी फांदी अचानक तुटून खाली पडली. या घटनेत एक दुचाकीस्वार जखमी झाला असून, त्याच्या वाहनाचेही नुकसान झाले आहे. यामुळे रस्त्यावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. सौरभ श्रोती असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. ते दर्यापूर तालुक्यातील खोलापूर (दारापूर) येथील रहिवासी असून, एका खासगी कंपनीत कामासाठी रोज अमरावतीत ये-जा करतात. सोमवारी विद्यापीठाकडे जात असताना आयुक्तांच्या बंगल्यासमोर त्यांच्या दुचाकीवर अचानक झाडाची फांदी कोसळली. फांदी एवढी मोठी होती की, तिने संपूर्ण रस्ता व्यापला. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबली. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि सौरभ श्रोती यांना रुग्णालयात दाखल केले. काही वेळाने मनपाच्या पथकानेही घटनास्थळी पोहोचून झाडाची फांदी हटवली. या दरम्यान सुमारे दोन तास वाहतूक ठप्प होती. मनपा आयुक्तांच्या बंगल्यासमोरच ही घटना घडल्याने परिसरात चर्चा होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *