Headlines

पोलिसांतर्फे विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम; दिले सुरक्षेचे धडे:सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण, महिला व बालक सुरक्षा, व्यसनमुक्त समाजासाठी श्री शिवाजी महाविद्यालयात जागृती‎



विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करणे, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण, महिला व बालक सुरक्षा, वाहतूक नियमांचे पालन तसेच व्यसनमुक्त समाज घडवण्याच्या उद्देशाने श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आय

.

प्राचार्य डॉ. सुनील पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कार्यक्रमात पोलिस उपनिरीक्षक समाधान मिसाळ यांनी सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण, ऑनलाइन फसवणूक, बनावट लिंक, ओटीपी फसवणूक, बँक खात्यांची माहिती सुरक्षित ठेवण्याचे महत्त्व, सोशल मीडियावरील अफवा, फेक अकाउंटपासून सावध राहण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कोणत्याही प्रकारची ऑनलाइन फसवणूक झाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. पोलिस कॉन्स्टेबल उमेश दुतोंडे, पोलिस कॉन्स्टेबल विशाल दरोका उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर प्रश्न विचारले. शंकांचे निरसन करून घेतले. पोलिस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित, सजग व जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन केले. प्राचार्य डॉ. सुनील पांडे यांनी पोलिसांचे आभार मानले.

अशा जनजागृतीपर कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी, कायद्याबाबत आदर, सुरक्षिततेची जाणीव निर्माण होण्यास मोठी मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. सचिन कोठेकर, डॉ. अब्दुल वाजिद, प्रा. सुरेंद्र देशमुख यांचे सहकार्य लाभले.

महिला हेड कॉन्स्टेबल अनिता बिजेवार यांनी महिला व बालक सुरक्षा, महिला सन्मान, लैंगिक छळ प्रतिबंध, ‘गुड टच-बॅड टच’, महिला हेल्पलाइन, आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची खबरदारी याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी निर्भयपणे शिक्षण घ्यावे. कोणत्याही प्रकारच्या त्रासाची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी, असे त्यांनी सांगितले. महिला हेड कॉन्स्टेबल शीतल असवार यांनी सोशल मीडियाचा सुरक्षित, जबाबदारीने वापर, वैयक्तिक माहितीची गोपनीयता, डिजिटल शिष्टाचार, सोशल मीडियाच्या सकारात्मक उपयोगाबाबत माहिती दिली. सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण, ऑनलाइन फसवणूक, बनावट लिंक, ओटीपी फसवणूक, बँक खात्यांची माहिती सुरक्षित ठेवण्याचे महत्त्व, सोशल मीडियावरील अफवा, फेक अकाउंटपासून सावध राहण्याबाबत मार्गदर्शन केले



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *