![]()
मुंबई-पुणे मिसिंग लिंकमधील २,८६५ कोटींचे दोन बोगद्यांची कामे नवयुग इंजिनिअरिंग कंपनीने केलेली आहेत. या कंपनीने भाजपला ५५ कोटींचा निवडणूक निधी दिला होता. १८ एप्रिल २०१९ रोजी प्रत्येकी १ कोटीचे ३० तर १० ऑक्टोबर २०२२ रोजी प्रत्येकी १ कोटीचे २५ असे एकूण ५५ कोटींचे निवडणूक रोखे कंपनीने भाजपसाठी खरेदी केले होते. ऑक्टोबर-२०१८ मध्ये कंपनीला कार्यादेश दिले. पण प्रत्यक्षात काम निवडणूक रोखे प्राप्त झाल्यानंतरच सुरू झाले. धक्कादायक बाब म्हणजे, याच कंपनीने उत्तराखंडमध्ये सिलकॅरा बोगद्याचे निकृष्ट काम केले होते. हा बोगदा कोसळून ४१ मजूर १६ दिवस अडकले होते. याचा महाराष्ट्र सरकारने धडा घेण्याऐवजी त्यांनाच बोगद्याचे काम दिले. १९.८० किमीचे काम २ भागात विभागले आहे. १ मे २०२६ रोजी उद्घाटन झालेल्या मिसिंग लिंकवरील बोगदा ५ व ६ जुलैच्या मुसळधार पावसात कोसळला होता. त्यामुळे सुमारे १९ तास वाहतूक ठप्प झाली होती. निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार निवडणूक रोखे भाजपनेच ‘रिडिम’केले टप्पा 1 : निवडणूक आयोगाच्या अहवालातील पान-क्रमांक २२ वर अनुक्रमांक १०६६ ते १०९५ पर्यंत कंपनीने १८ एप्रिल २०१९ रोजी प्रत्येकी १ कोटीचे ३० निवडणूक रोखे खरेदी केले होते.
टप्पा 2 : १० ऑक्टोबर २०२२ रोजी प्रत्येकी १ कोटींचे आणखी २५ निवडणूक रोखे खरेदी केले. २ बोगद्यांवर २,८६५ कोटी खर्च नवयुगला २ बोगद्यांचे तर ॲफकॉन इन्फ्राला केबल स्टेड पुलाचे काम दिले होते. २ बोगद्यांवर २,८६५ कोटी तर केबल स्टेड पुलाला २,१३७ कोटी रुपयांचा खर्च लागला. खरेदीची तारीख रोखे रक्कम पक्ष कॅश केल्याची तारीख
१८ एप्रिल २०१९ ३० ३० कोटी भाजप २३-२५ एप्रिल २०१९
१० ऑक्टो. २०१९ २२ २२ कोटी भाजप १५ ऑक्टोबर २०१९
एकूण ५२ ५२ कोटी भाजप स्त्रोत : केंद्रीय निवडणूक आयोग
1 आशियातील सर्वात मोठा बोगदा या मार्गावर २ मोठे बोगदे आहेत. यातील एक बोगदा ८.९ किलोमीटर लांबीचा आहे. आशियातील सर्वाधिक २१.४५ मीटर रुंदीचा चौपदरी बोगदा आहे. उर्वरित. 2 केबल स्टेड पूल कुसगाव ते चाळकेवाडी दरम्यान १३५ मीटर उंचीचा भव्य केबल स्टेड पूल बांधण्यात आला आहे. हा मार्ग दोन्ही बाजूने प्रत्येकी ४-४ चौपदरी. 3 वेळेची बचत खालापूर ते सिंहगड इन्स्टिट्यूट दरम्यान ६ किमीने अंतर कमी झाले. वाहतूक कोंडी व दरडी कोसळण्याचा धोका टळावा म्हणून मिसिंग लिंकचे काम केले.
Source link
कोसळलेला ‘सिलकॅरा’ही नवयुगनेच बांधला:मिसिंग लिंक बांधणाऱ्या ‘नवयुग’ने भाजपला दिला होता 55 कोटी फंड