![]()
गोवा राज्यात विक्रीस असलेल्या अवैध विदेशी मद्याची वाहतूक आणि बनावट दारूची निर्मिती करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सिल्लोडच्या पथकाने फुलंब्री तालुक्यात कारवाई केली. २१ जुलै रोजी केलेल्या या धडक कारवाईत एकूण ११ लाख ८१ हजार ८०० रुपये किमतीचा मुद
.
फुलंब्री व वडोद बाजार पोलिस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री चालू असून याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाला गुप्त बातमीच्या आधारे पथकाने आडगाव बु. (ता. फुलंब्री) आणि बाभूळगाव शिवारात छापे टाकून कारवाई केली. या कारवाईत सोमनाथ भागीनाथ जगताप (रा. आडगाव बु.), सत्तार अहमद शेख (रा. निल्लोड) आणि विकास प्रभाकर गोराडे (रा. निल्लोड) या आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई निरीक्षक एन. आर. मुंजाळ, दुय्यम निरीक्षक ए. टी. बीडकर, व्ही. जी. साळुंके, ए. पी. तनपुरे, कृष्णा पाटील, राहुल बनकर आदींनी केली आहे.