![]()
नाशिक जिल्हा विधी सेवा समितीच्या मार्गदर्शनाखाली, चांदवड तालुका विधी सेवा समिती आणि चांदवड तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. १८) येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्ट (एनआय अॅक्ट) कलम १३८ अंतर्गत विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. या लोकअदालतीत धनादेश अनादराच्या २४ प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्यात आला असून, एकूण ४२ लाख ४० हजार ८४० रुपयांची वसुली करण्यात आली. लोकअदालतीचे आयोजन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एस. एस. छल्लानी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. पॅनलप्रमुख म्हणून दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व्ही. डी. सुंगारे यांनी कामकाज पाहिले, तर पॅनल सदस्य म्हणून अॅड. सचिन वाळुंज यांनी जबाबदारी पार पाडली. या विशेष लोकअदालतीसाठी एनआय अॅक्ट कलम १३८ अंतर्गत एकूण २६१ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी २४ प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षांमध्ये यशस्वी तडजोड होऊन प्रकरणांचा निपटारा झाला. या प्रकरणांमधून एकूण ४२ लाख ४० हजार ८४० रुपयांची वसुली करण्यात आली. लोकअदालतीस तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड. दिनकर ठाकरे, उपाध्यक्ष अॅड. भैय्यासाहेब पटेल, वकील संघाचे सदस्य, न्यायालयीन कर्मचारी तसेच संबंधित पक्षकार उपस्थित होते.लोकअदालतीच्या माध्यमातून न्यायालयीन प्रकरणांचा जलद, कमी खर्चात आणि परस्पर सामंजस्याने निपटारा होत असल्याने पक्षकारांचा वेळ व खर्च वाचतो. धनादेश अनादराच्या प्रकरणांमध्ये तडजोडीला प्रोत्साहन मिळाल्याने न्यायालयांवरील प्रलंबित प्रकरणांचा ताणही कमी होण्यास मदत होते.
Source link
चांदवडला 261 पैकी 24 प्रकरणे निकाली:24 धनादेश अनादर प्रकरणांचा निपटारा; 42 लाखांची वसुली