Headlines

‘माउली… माउली’च्या गजरात बाजीराव विहीर रिंगण सोहळा:आज पालखी सोहळा पंढरपूरकडे करणार प्रस्थान




श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील रिंगण बाजीराव विहीर (ता. पंढरपूर) येथे लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत गुरुवारी मोठ्या उत्साहात पार पडले. वाखरीच्या पालखी तळावर दाखल झालेल्या विविध संतांच्या दिंडी सोहळ्यातील हजारो वारकरी बाजीराव विहीर परिसरात दाखल झाले होते. सायंकाळी ५.३० वाजता माउलींचा सोहळा रिंगणस्थळी आला. यानंतर सेवेकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या तालावर खांद्यावरून पालखी नाचवत रिंगण पाहण्यासाठी थांबलेल्या वारकऱ्यांच्या भोवतीने रिंगण घातले. मानाच्या दिंड्यांनी झेंडा घेऊन रिंगणात प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर अश्वस्वार रिंगणाला सुरुवात झाली. या वेळी उपस्थित वारकऱ्यांनी माउली… माउलीचा गजर केल्यानंतर परिसरात चैतन्य पसरले. आज पालखी सोहळा पंढरपूरकडे करणार प्रस्थान शुक्रवारी (२४ जुलै) वाखरी येथून दुपारी पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. पंढरपूरच्या वेशीवर आल्याने भाविक पांडुरंगाचा जयघोष करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *