Headlines

चापानेर येथे तीन घरे फोडली, मंदिरातही चोरी:सुमारे साडेसहा लाख रुपयांचे दागिने लंपास, नागरिकांच्या घरांच्या बाहेरून लावून घेतल्या कड्या; कन्नड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद‎



कन्नड तालुक्यातील चापानेर येथे बुधवारी रात्री चोरांनी धुमाकूळ घातला. जैन मंदिरासह तीन घरे फोडली. चोरी करताना आजूबाजूच्या घरांना बाहेरून कड्या लावून घेतल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले. चोरट्यांनी साडेसहा लाखांचे दागिने लंपास केले.

.

चापानेर येथे निवृत्त कर्मचारी अशोक विनायक माळोदे यांच्या घराचा कडीकोयंडा तोडला. परंतु चोरांच्या हाती काही लागले नाही. त्यानंतर त्यांनी रामहरी कचरू भाडाईत यांचे घर फोडले. पोपट नारायण जाधव हे पत्नी योगिता जाधव यांच्यासह पंढरपूर वारीस गेलेले आहेत. घरात रुद्र जाधव हा एकटाच घरात झोपलेला होता. या घरात दरवाजा तोडून घुसून चोरांनी लाकडी व लोखंडी कपाट तोडले. यातून सोन्याची एक दाणी, एक मोठी पोत, कानातले झुंबर, चांदीचे जोडवे असे साडेसहा लाखांचे दागिने लंपास केले. शेजारी पोपट जाधव यांचे अन्य तीन भाऊ शेजारी-शेजारी राहतात. दरवाजा तोडल्याचा आवाज आल्याने वैशाली जाधव या जाग्या झाल्या. दरवाजा उघडून बाहेर येण्याचा प्रयत्न केला असता बाहेरून कडी लावलेली होती. नागरिकांनी बाहेर येऊन चोरांचा शोध घेतला, पण ते आढळून आले नाहीत. याच दरम्यान जैन मंदिर फोडून पितळेच्या दोन मूर्ती चोरून नेल्याचे निदर्शनास आले.

सहायक पोलिस निरीक्षक नारायण गिते यांनी भेट दिली. कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास बाबू मुंडे हे करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *