![]()
कन्नड शहरात बुधवारी (दि.२२) पहाटे तीन ते सहा वाजेरदरम्यान मुसळधार पाऊस झाला. या पावसाने शहरातील जवाहर कॉलनी, मोमीनपुरा, म्हाडा कॉलनी, त्रिशरण बुद्धविहार, सुंदर कॉलनी या वसाहतीकडे जाणारा रस्ता जलमय होऊन नागरिकांचे दळणवळण ठप्प झाले. नगर परिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे, नगराध्यक्ष फरीन बेगम, नगरसेवक अब्दुल जावेद, बंटी सुरे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन युद्धपातळीवर रस्ता मोकळा करण्याची मोहीम राबवली. चार तासांत रस्ता मोकळा करून दिल्याबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. कन्नड शहरातील हिवरखेडा रोडलगत असलेल्या सिंचन विभागाच्या नाल्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. हा नाला बुजल्यामुळे शिवाजी कॉलेज, ग्रामीण रुग्णालय, जवाहर नवोदय विद्यालय, चंद्रलोकनगरी, पांडवनगरी या वसाहतीतील व डोंगरातील पाणी जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. बुधवारी झालेल्या पावसाने हे सर्व पाणी जवाहर कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर तुंबले. त्यामुळे या भागातील दळणवळण ठप्प झाले. नागरिकांनी नगरपालिकेत तक्रार नोंदवली असता मुख्याधिकारी रवींद्र लांडे, नगराध्यक्ष फरीन बेगम अब्दुल जावेद, नगरसेवक अब्दुल जावेद, नगरसेवक बंटी सुरे गोकुळ राठोड, राजू शेख, वाल्मीक शिरसाठ यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तुंबलेले पाणी काढण्यासाठी दोन जेसीबी आणण्यात आले. त्याद्वारे रस्त्यावरील पाणी काढून चार ट्रॅक्टरद्वारे रस्त्यावर मुरूम, कच टाकण्यात आला.
Source link
कन्नड शहरात पहाटे तीनतास मुसळधार पाऊस:रस्त्यावर पाणी, पालिकेने रस्ता केला मोकळा