![]()
मनपा स्थायी समितीच्या सभेत कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पुरवठा करणाऱ्या दोन कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या खात्यात पूर्ण वेतन जमा न करणे, कर न भरणे आणि करारातील अटींचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत एनटीएस ग्रुप, अकोला आणि महात्मा फुले मल्टी सर्व्हिसेस, संभाजीनगर या दोन कंत्राटदारांना मुदतवाढ नाकारण्यात आली. तसेच पंतप्रधान ई-बस सेवा योजनेसाठी नाशिकच्या सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यास मंजुरी देण्यात आली. मनपाच्या सभागृहात गुरुवारी झालेल्या सभेत नाल्यांच्या स्वच्छतेचा मुद्दा चांगलाच गाजला. वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक नीलेश देव यांनी बिर्ला रोडसह अनेक भागांतील नाले अद्यापही गाळाने भरले असल्याची तक्रार केली. नगरसेवक विनोद मापारी यांनीही अनेक नाले स्वच्छतेच्या यादीतून वगळल्याचा आरोप केला. त्यावर सभापती विजय अग्रवाल यांनी सात दिवसांत नाले स्वच्छ न झाल्यास संबंधित ठेकेदाराकडून बिलाच्या दुप्पट रकमेचा दंड वसूल करण्याचे निर्देश दिले. उर्वरित पान ४
Source link
दोन कंत्राटदार काळ्या यादीत; वेतन थकवणे, करारभंग भोवला:ई-बस सेवेसाठी नाशिक येथील सल्लागार नियुक्त