Headlines

पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा:पोलिसांमधील विकृतीची कीड साफ करा, विद्यार्थिनीशी झालेल्या गैरवर्तनावर विजय वडेट्टीवार आक्रमक




पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरे जावं लागले, या प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. वांगचुक यांनी 27 व्या दिवशी उपोषण मागे घेतले पण त्यांना 27 दिवस वाट पाहावी लागली हेच सरकारचे अपयश आहे. लोकशाही मार्गाने आंदोलनकर्त्यांना सरकार महत्त्व देत नाही हे यातून त्यांनी स्पष्ट केले आहे, आंदोलनाप्रती केंद्र सरकारची भूमिका मस्तीची होती हे दिसून आले. मुंबईतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान एका तरुणीशी गैरवर्तन झाल्याच्या घटनेचा निषेध करत विजय वडेट्टीवार म्हणाले की, तरुणींचा विनयभंग करण्याच्या घटना आंदोलनामध्ये घडल्या. पोलिस विभागात जे विकृत निर्माण झाले आहेत ती कीड स्वच्छ करण्याची गरज आहे. पोलिसांनी आंदोलन शांततेत पार पडावे अशी भूमिका पार पाडायला हवी होती. पण तसे झाले नाही. उलट मुलींचे विनयभंग करण्यात आले, तरुणांना ड्रग्जच्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देण्यात आली. सर्वच पोलिस असे वागतात असे नाही काही पोलिस चांगले सुद्धा आहेत. पण गृह विभागाचा धाक कमी झाला आहे का? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे. जे यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांचे निलंबन करत गुन्हा दाखल केला पाहिजे. पेपरफुटीला सरकारचे मुक समर्थन विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत आहे. तरुणांना त्यांचे भविष्य सुरक्षित वाटत नाही. सरकारकच्या शिक्षण प्रणालीवर तरुणांचा विश्वास राहिलेला नाही. इतक्यांदा पेपरफुटी झाली तरी सरकार मंत्र्यांवर कारवाई करू शकत नाही याचा अर्थ सरकारचे मुक समर्थन या पेपरफुटी प्रकरणाला आहे, हे सरकार पुरस्कृत आहे. यामुळे तरुणांच्या भावना भडकल्या आहेत ते आता राजीनामा झाल्याशिवाय शांत होणार नाही. नवीन कायदे आणले तरी बदल होणार नाही विजय वडेट्टीवार म्हणाले की, पेपरफुटी रोखण्यासाठी कायदे अस्तित्वात असतानाही त्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. वारंवार पेपरफुटी होत असताना जबाबदारांवर कारवाई झाली नाही, त्यामुळे पुन्हा नवीन कायदे आणले तरी बदल होणार नाही. मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी खासगी कंपनीमार्फत तयार करण्यात आलेल्या नव्या पोर्टलवरून नागरिकांकडून शुल्क आकारण्याच्या प्रस्तावालाही आमचा विरोध आहे. सामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकून खासगी कंपनीला फायदा करून देण्याचा प्रयत्न होत आहे, सामान्य जनतेची लूट होऊ देणार नाही आणि या निर्णयाला तीव्र विरोध केला जाईल. राज्य गुन्हेगारांसाठी सुरक्षित झाले आहे का? विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्य गुन्हेगारांसाठी सुरक्षित झाले आहे का? जेलमध्ये गेलो तरी आमचे चोचले पुरवले जातील म्हणून गुन्हा करणाऱ्यांना जेलची भीती वाटत नाही. त्यांना ती भीती वाटली पाहिजे, अशी सरकारकडून अपेक्षा असते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *