Headlines

मानवी साखळी अन् मार्च काढून दिल्लीतील लाठीमाराचा निषेध:केंद्रीय शिक्षणमंत्री‎ धर्मेंद्र प्रधान यांच्या‎राजीनाम्याची मागणी




दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन‎करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या‎पोलिसांकडून झालेल्या लाठीमाराचे‎पडसाद शुक्रवारी अहिल्यानगरात उमटले. ‎‎शहरातील वर्दळीच्या दिल्लीगेट परिसरात ‎‎विद्यार्थी आणि विविध सामाजिक‎संघटनांचे कार्यकर्ते एकवटले. वाहतुकीला ‎‎अडथळा होऊ नये, याची काळजी घेत ‎‎विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या एका बाजूला मानवी ‎‎साखळी तयार करत शांततेच्या मार्गाने‎निषेध नोंदवला. हातात मागण्यांचे फलक ‎‎आणि घोषणांची पोस्टर घेऊन उभ्या‎असलेल्या विद्यार्थ्यांच्या लांबच लांब रांगेने‎नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.‎ दिल्लीत जंतर-मंतर येथे सीजेपीचे‎अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली‎आंदोलन सुरू आहे. नीट पेपर घोटाळ्याच्या‎निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र‎प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या‎मागणीसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू‎आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी‎देशभरातून आवाज उठत असून, त्याचाच‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎एक भाग म्हणून अहिल्यानगरातही‎विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून निषेध केला.‎ शुक्रवारी दुपारी दिल्लीगेट परिसरात‎विद्यार्थी एकत्र येण्यास सुरुवात झाली.‎सुरुवातीला दिल्लीगेटपासून सिद्धीबागेपर्यंत‎विद्यार्थ्यांची रांग लागली. एक विद्यार्थी‎जोडला की रांग पुढे वाढत होती. पोस्टर ठरले नागरिकांच्या‎कुतूहलाचा विषय‎
विद्यार्थ्यांच्या हातातील विविध मागण्यांचे‎फलक आणि पोस्टर हे आंदोलनाचे विशेष‎आकर्षण ठरले. एनटीए रद्द करा!, धर्मेंद्र‎प्रधान राजीनामा द्या!, “जुल्मी जब-जब‎जुल्म करेगा, सत्ता के हथियारोंसे, चप्पा‎चप्पा गुंज उठेगा इंकलाब के नारो से!,‎दिल्ली पुलिस मुर्दाबाद,३२ करोड है‎बेरोजगार, कौंन है इसका जिम्मेदार! अशा‎घोषणा या फलकांवर होत्या. रस्त्याने‎जाणारे अनेक नागरिक विद्यार्थ्यांच्या‎हातातील पोस्टर वाचण्यासाठी काही क्षण‎थांबत होते. त्यामुळे दिल्लीगेट परिसरात‎आंदोलन सुरू असताना नागरिकांमध्येही‎या विषयाची चर्चा रंगली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *