![]()
शहरात जानेवारी ते जून या सहा महिन्यांत ६५५ संशयित रुग्णांचे रक्तनमुने तपासण्यात आले असून त्यापैकी ६० रुग्ण डेंग्यू तर ३३ रुग्ण िचकुनगुन्याने बाधित असल्याचे निष्पन्न झाले. शहरात ९३ डासजन्य रुग्णांची नोंद झाली आहे. आगामी काळात रुग्णसंख्या वाढू नये यासाठी महानगरपालिकेच्या मलेरिया विभागाने २० प्रभागांमध्ये प्रत्येकी कर्मचारी नियुक्त करून फवारणी सुरू केली आहे. पावसाळ्यात एडिस डासांची पैदास झपाट्याने वाढते. घराच्या आजूबाजूला, छतावर, कुलरमध्ये, पाण्याच्या टाक्यांमध्ये साचलेले पाणी या डासांच्या प्रजननासाठी पोषक ठरते. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील प्रत्येक प्रभागात फवारणीसाठी कर्मचारी नियुक्त केले आहेत. ताप, तीव्र अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे वेदना किंवा अंगावर पुरळ अशी लक्षणे दिसल्यास स्वतःहून औषधे न घेता तातडीने डॉक्टरांकडे जाऊन रक्त तपासणी करून घेणे आवश्यक आहे. महानगरपालिकेकडून प्रत्येक प्रभागात फवारणी, अळीनाशक औषधांची फवारणी आणि सर्वेक्षण सुरू आहे. गेल्या दोन-तीन िदवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचे पाणी साचणाऱ्या िठकाणांवर डास उत्पत्ती लवकर होते. त्यामुळे घराचा परिसर स्वच्छ ठेवावा व डास उत्पत्ती रोखावी, असे आवाहनही महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. ^पावसाळ्यात डेंग्यू आणि िचकुनगुनियाचा धोका वाढत असतो. मात्र गेल्या काही वर्षांतील आकडेवारी पाहता यंदा तुलनेने रुग्णांची संख्या कमी आहे. चिकनगुनियाचे रुग्ण तुलनेने काही प्रमाणात वाढले आहेत. मात्र दर सात दिवसांनी प्रत्येक भागात डास प्रतिबंधक औषधांची फवारणी सुरु केली आहे. पुढील काही दिवस डासांची उत्पत्ती होण्यास पोषक असल्याने फवारणी सोबतच फॉगींग केली जाणार आहे. -डॉ. नितीन गायकवाड, मलेरिया विभाग प्रमुख, महानगरपालिका जून तसेच जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. सलग पाऊस आल्यास याच महिन्यात कीटकजन्य आजारांचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत असतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने खंड दिल्याने डासांना पोषक वातावरण तयार होऊ शकले नाही. जमिनीवर पाणी न साचल्याने डासांच्या अळ्या व अंडी सुकून नष्ट झाले.
Source link
आजाराचा फैलाव:तपासणीनंतर शहरात डेंग्यूचे 60 चिकुनगुन्याचे 33 रुग्ण आढळले