Headlines

श्रावण मेळ्याच्या आयोजनातून‎ दिव्यांगांना मिळणार रोजगार‎:अग्रसेन भवनात आज, उद्या मेळाव्याचे आयोजन‎




अग्रवाल जागृती महिला मंडळ, अग्रवाल सखी मंच आणि दिव्यांग सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २५ व २६ जुलै रोजी अग्रसेन भवनात श्रावण मेळा आयोजित करण्यात आला आहे. दिव्यांगांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हे या मेळ्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. मेळ्यात दिव्यांग सोशल फाउंडेशनचे विशेष ‘कलादालन’अकोलेकरांसा ठी उपलब्ध असणार आहे. यात दिव्यांगांनी स्वतः तयार केलेल्या आकर्षक राख्या, विविध कलात्मक वस्तू आणि पूजा साहित्य नागरिकांना खरेदी करता येईल. या उपक्रमातून मिळणारा निधी दिव्यांगांचे शिक्षण, रोजगार आणि आरोग्यासाठी वापरला जाणार असल्याची माहिती दिव्यांग सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विशाल कोरडे यांनी दिली. सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत भरणाऱ्या या मेळाव्यात महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने विशेष स्टॉल्सही उभारण्यात आले आहेत, अशी माहिती अग्रवाल जागृती महिला मंडळाच्या अध्यक्षा समता केडिया व अग्रवाल सखी मंचच्या अध्यक्षा श्वेता केडिया यांनी दिली. शहरातील नागरिकांनी या उपक्रमाला मोठ्या संख्येने भेट देऊन दिव्यांगांना प्रोत्साहन व सहकार्य करावे, असे आवाहन आयोजन समितीच्या मीना केडिया, मंजू धामोरिया, अनुश्री लोया व स्मिता केडिया यांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *