Headlines

फुलांच्या शामियानात सावळा विठ्ठल:आषाढी एकादशीच्या निमिताने पांडुरंगाचे डोळयांचे पारणे फेडणारे रूप, पाहा फोटो VIDEO




रंगीबेरंगी फुलांचा साज, तो दरवळणारा सुगंध आणि त्यात विराजमान झालेली विठू माउली… एकादशीच्या निमित्ताने आज पंढरपूरच्या सावळ्या विठ्ठलाचे रूप डोळ्याचं पारणं फेडत आहे. संपूर्ण मंदिरात विविध फुलांच्या माळा लावण्यात आल्या असून मंदिर अत्यंत लोभसवाणं दिसत आहे. हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्त आले आहेत. मोगरा, जाई, जुई, गुलाब, निशिगंध यासारख्या विविध फुलाच्या माळा करण्यात आल्या असून सभामंडपात फुलांचं झुंबर देखील तयार करण्यात आलं आहे. फुलांना लाईटिंगची साथ असल्यामुळे त्यावरून डोळेच हटत नाहीयेत. फुलांच्या या शामियानात नटलेला पांडुरंग फोटोमध्ये पहा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *