Headlines

अकोल्यात शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षाचा मृत्यू:पक्षांतर्गत वादातून माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात घडवल्याचा नातेवाईकांचा आरोप




उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख मोहसीन शेख समद यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सुरुवातीला केवळ एक अपघात वाटणाऱ्या या घटनेला आता धक्कादायक वळण मिळाले असून, हा साधा अपघात नसून पक्षाच्याच माजी जिल्हाप्रमुखाने रचलेला हत्येचा हा एक सुनियोजित कट असल्याचा गंभीर आरोप मृत नेत्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख मोहसीन शेख समद यांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूमुळे अकोला जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. हा निव्वळ अपघात नसून, पक्षांतर्गत वाद आणि जुन्या राजकीय वैमनस्यातून माजी जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांनी जाणीवपूर्वक त्यांच्या अंगावर वाहन घालून हा घातपात घडवून आणल्याचा खळबळजनक दावा मृत मोहसीन यांच्या नातेवाईकांनी केला आहे. शेख मोहसीन यांच्या मृत्यूची बातमी पसरताच संतापलेले नातेवाईक, पक्षाचे कार्यकर्ते आणि मुस्लिम समाज बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत खदान पोलिस ठाण्यावर धडक दिली. या प्रकरणातील मुख्य संशयित मंगेश काळे आणि त्यांच्या साथीदारांवर हत्येचा (कलम 302) गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करावी, या प्रमुख मागणीसाठी पोलिस ठाण्याबाहेर प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. ज्यामुळे अकोल्यात रात्री उशिरापर्यंत अतिशय तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नेमके काय घडले? 23 जुलै, गुरुवारच्या संध्याकाळी अकोल्यातील नेहरू पार्क परिसरातून आपल्या दुचाकीवरून जाणाऱ्या शिवसेना (शिंदे गट) अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख मोहसीन यांच्या गाडीला मागून जोरदार धडक बसल्याने त्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही रात्री उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. हा निव्वळ अपघात होता की जाणीवपूर्वक घडवून आणलेला घातपात, याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी आता घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास वेगाने सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज जप्त दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा सर्व अंगांनी सखोल तपास सुरू केला असून, घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले आहे. हा केवळ अपघात होता की पूर्वनियोजित घातपात, याचा खरा उलगडा पोलिस तपासानंतरच होईल. सध्या तरी हे सर्व आरोप मृत मोहसीन यांच्या कुटुंबीयांनी केले असून, पोलिसांकडून याला कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. त्यामुळे तपासातून काय निष्कर्ष निघतो, याकडे संपूर्ण अकोला जिल्ह्याचे लक्ष लागले असून, या घटनेमुळे शहरात तणावपूर्ण शांतता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *