Headlines

MH-CET Data Leak Controversy; Rohit Pawar Demands FIR & Probe


गेल्या महिनाभरापासून MH-CET परीक्षेतील गोंधळ आणि घोटाळ्याच्या विरोधात शिक्षक आणि पालकांसह लढा देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारसमोर ४ प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र

.

प्रतिनिधींना परवानगी नाकारली

रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (X) पोस्ट करत या बैठकीसंदर्भात सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत शिनगारे सर, प्रा. खरसडे सर, प्रा. जोशी सर, प्रा. डोके सर यांच्यासह इतर शिक्षक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थ्यांची बाजू मांडण्यासाठी प्रतिनिधी म्हणून सुनील माने आणि फहाद अहमद यांची नावे देण्यात आली होती. परंतु, दुर्दैवाने मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांच्या नावांना परवानगी नाकारली आहे.

रोहित पवारांच्या ४ प्रमुख मागण्या:

या बैठकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी CET सेलच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत खालील प्रमुख मागण्या शासनासमोर ठेवल्या आहेत:

  1. न्यायालयीन चौकशी: CET मधील पर्सेंटाईल घोटाळ्याची तत्काळ उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी.
  2. डेटा लीक प्रकरणी FIR: CET मधील डेटा लीक प्रकरणात कोणतीही दिरंगाई न करता तत्काळ FIR दाखल करून दोषींवर कारवाई करण्यात यावी.
  3. कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करा: EduSpark, SkillTree आणि Indus या कंपन्या एकमेकांशी संबंधित असल्याचे पुरावे CET सेलला देऊन सिद्ध झालेले आहे. CET सेलच्या टेंडर्समध्ये कार्टेल करणाऱ्या या तिन्ही कंपन्यांना तातडीने ब्लॅकलिस्ट करावे. तसेच २०२१ पासून त्यांना देण्यात आलेल्या सर्व कामांची चौकशी करून त्यांच्याकडून पैसे वसूल करावेत.
  4. परीक्षा ऑफलाइन घ्या: सातत्याने होणारे तांत्रिक गोंधळ आणि घोटाळे टाळण्यासाठी MH-CET परीक्षा ऑनलाइन न घेता पूर्वीप्रमाणेच ऑफलाइन (Offline) पद्धतीने घेण्यात यावी.

या प्रमुख मागण्यांवर बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन त्या मान्य होणे अत्यंत गरजेचे आहे. तरच या प्रक्रियेत पारदर्शकता येईल, अन्यथा विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा CET सेलवरील विश्वास पूर्णपणे उडून जाईल. सर्व शिक्षक प्रतिनिधी या मागण्या आग्रहाने मुख्यमंत्र्यांसमोर मांडतील आणि मुख्यमंत्री यावर योग्य तो निर्णय घेतील, अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.

———–

ही बातमी पण वाचा..

अमित शहांनी सणासुदीत मुंबईत 100 गाड्यांचा ताफा घेऊन फिरू नये: राऊतांचा टोला; जरांगेंच्या भाषेचे समर्थन करत राऊतांचे सरकारवर टीकास्त्र

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. “अमित शाह हे मुंबईत केवळ फंड कलेक्शनसाठी येतात. मुंबईत बिल्डर, जमिनीचे व्यवहार करणारे लोक आणि हजारो कोटींच्या थैल्या असल्याने ते येथे रमतात,” असा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. सोबतच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत, त्यांच्या भाषेवर आक्षेप घेणाऱ्या राज्य सरकारचा राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.