![]()
पक्षाचा कार्यकर्त्या कोणत्या नेत्यांच्या घरी जेवनासाठी येत नाही. त्यांची अपेक्षा असते की आपल्या गावातील कामे झाली पाहिजेत. नंदुरबारमध्ये आमशा पाडवी आणि मी दोघे शिवसेनेचे आमदार आहोत, पण शिवसैनिकांना न्याय देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे, अशी खंत शिवसेनेचे आमदार आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मंत्री उदय सामंत आणि गुलाबराव पाटील यांच्यासमोर बोलताना व्यक्त केली आहे. आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की, जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाचे विधानसभेचे 3 आमदार आहेत त्यामध्ये शिवसेनेचा 1 तर भाजपचे दोन आमदार आहेत. 20 टक्के प्रत्येक आमदारांना दिला जातो पालकमंत्र्यांना 30 तर उरलेल्या 10 टक्क्यांमध्ये सर्व पक्षाचे सर्व नेते आहेत. माझी मंत्र्यांना विनंती आहे की केवळ विधानसभेसाठी पैसे देऊ नका, तुम्ही पक्षाला निधी द्या. आमच्यात मतभेद नाही. पण 17 जिल्हा परिषद सदस्यासांच्या मतदारसंघात जर निधीच दिला नाही तर शिवसेनेची सत्ता येईलच कशी असा सवाल रघुवंशी यांनी केला आहे. …म्हणून जिल्ह्यात पक्ष संघटना वाढत नाही आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की, आमची ताकद आहे पण कार्यकर्त्यांच्या मतदारसंघात कामे झाले पाहिजे, निधीवाटपाबद्दल मंत्र्यांनी फेर विचार करावा. जिल्ह्यात पक्ष संघटना वाढत नाही त्यांचे एकमेव कारण हेच आहे. भाजपचे दोन आमदार आहेत आहेत त्यांच्याकडे भरपूर निधी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार नाही पण पालकमंत्र्यांकडे 30 टक्के निधी आहे, अशा वेळेस शिवसेनेला काहीच मिळत नाही. आमदारांना अथवा नेत्यांना स्वतःसाठी निधी नको आहे, तर पक्षाच्या माध्यमातून स्थानिक विकासाची कामे होण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. कार्यकर्त्यांना कामे करता आली तरच पक्षाची ताकद वाढेल. आमदार रघुवंशी भावूक कार्यकर्त्यांच्या या मेळाव्यात व्यासपीठावर पक्षाची ही विदारक स्थिती मांडताना आमदार रघुवंशी भावूक झाले आणि त्यांचा कंठ दाटून आला. काही क्षण स्तब्ध राहून आणि पाणी प्यायल्यानंतर त्यांनी पुन्हा आपले भाषण सुरू ठेवले. पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व आणि मंत्र्यांनी स्थानिक पातळीवरील हे संकट आणि अडचणी गांभीर्याने समजून घ्याव्यात, असा इशाराही त्यांनी या प्रसंगी दिला.
Source link
निधीच मिळणार नसेल तर शिवसेनेची सत्ता कशी येणार?:भाजपच्या आक्रमकतेमुळे निधीअभावी पक्षविस्तारात अडचणी- आमदार चंद्रकांत रघुवंशी