![]()
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा न्यायालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयात मोटार अपघात नुकसानभरपाईचे एक महत्त्वाचे प्रकरण तडजोडीने निकाली निघाले. यामध्ये मयत मानसी हेमंत शर्मा यांच्या वारसांना तब्बल ४४ लाख रुपयांची भरपाई मंजूर करून त्याचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. प्रकरणातील मयत मानसी शर्मा यांच्या वारस मायादेवी शर्मा यांना विमा कंपनीकडून भरपाईचा धनादेश देण्यात आला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एस. गुप्ता यांच्या हस्ते हा धनादेश प्रदान करण्यात आला. अर्जदारांच्या वतीने ॲड. राहुल झावरे आणि ॲड. स्नेहा झावरे यांनी बाजू मांडली.यावेळी मार्गदर्शन करताना न्यायाधीश आर. एस. गुप्ता म्हणाले की, आपसातील सामंजस्यातून प्रकरणे मिटवल्यास अर्जदार व विमा कंपनी दोघांचाही फायदा होतो. प्रलंबित प्रकरणांचा ताण कमी होऊन पीडितांना वेळेत आर्थिक स्थैर्य मिळते. त्यामुळे पक्षकारांनी लोकन्यायालयाला प्राधान्य द्यावे. कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश के. एस. कुलकर्णी, प्राधिकरणाचे सचिव वाय. एस. पैठणकर, पॅनल विधीज्ञ ॲड. फारुक शेख, विमा कंपनीच्या वकिलांसह अधिकारी उपस्थित होते.
Source link
मयताच्या वारसांना 44 लाखांची नुकसानभरपाई:लोकन्यायालयात मोटारअपघाताचा वाद मिटला