![]()
सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे २१३० दलघफू क्षमतेचे ओझरखेड धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरण पूर्ण भरल्यामुळे दिंडोरी आणि कसबे वणी परिसरातील जलसंकट दूर झाले आहे.
.
ओझरखेड धरण हे दिंडोरी नगरपंचायत आणि कसबे वणी ग्रामपालिका व लगतच्या ग्रामीण भागासाठी पाण्याचा मुख्य स्त्रोत आहे. उन्हाळ्यात आणि पावसाच्या सुरुवातीला पाण्याचा तुटवडा जाणवत असल्याने नागरिक चिंतेत होते. दिंडोरी नगरपंचायतीने चार दिवसाआड पाणी पुरवठा केल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते, आता धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे कसबे वणी आणि दिंडोरी शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. आगामी काळात शेतीसाठी आणि सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
ओझरखेड धरण परिसरातील उद्योगांचाही मोठा प्रश्न सुटला आहे. लखमापूर औद्योगिक वसाहतीचा संपूर्ण पाणीपुरवठा याच धरणावर अवलंबून आहे. गेल्या काही दिवसांपासून धरणातील साठा कमी असल्याने उद्योगांना पाण्याच्या तुटवड्याचा सामना करावा लागत होता. आता धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे येथील कारखान्यांना अखंडित पाणीपुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.