Headlines

सुषमा अंधारेंचे आरोप राजकीय हेतूने प्रेरित:त्यांना उत्तर देण्याचे माझ्यावर कुठलेही बंधन नाही, दीपक केसरकर यांचा पलटवार




नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणावरून महाराष्ट्रात राजकारण चांगलेच तापले असून, आता शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात थेट जुंपली आहे. “अशोक खरातचा ‘सीडीआर’ खरा असेल, तर एसआयटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांना चौकशीला कधी बोलावणार?” असा रोखठोक सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला आहे. यावर प्रत्युत्तर देताना, “केवळ फोटो असणे हा गुन्हा नाही,” असे म्हणत दीपक केसरकर यांनी अंधारेंचे आरोप फेटाळून लावले आहेत. सुषमा अंधारेंचे आरोप हे राजकीय हेतूने असून, त्यांच्या आरोपांना उत्तर देण्याचे मला बंधन नसल्याचे दीपक केसरकर म्हणालेत. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेत गृहखात्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. खरात प्रकरणातील कथित सीडीआरचा दाखला देत त्या म्हणाल्या की, “अशोक खरातचे जे सीडीआर समोर आले आहेत, ते खरे की खोटे हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे. जर ते खरे असतील, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री दीपक केसरकर यांना एसआयटी चौकशीसाठी कधी पाचारण करणार? तसेच रुपाली चाकणकर यांना गजाआड कधी केले जाणार? या प्रश्नांची उत्तरे राज्यातील जनतेला मिळाली पाहिजेत,” अशी मागणी त्यांनी केली. केसरकरांचे स्पष्टीकरण – हे केवळ राजकीय वळण सुषमा अंधारे यांच्या आरोपांवर बोलताना आमदार दीपक केसरकर यांनी आपली बाजू स्पष्ट केली. “अशोक खरात प्रकरणाची एसआयटी आणि ईडी (ED) या दोन्ही यंत्रणांकडून सखोल चौकशी सुरू आहे. जिथे कोणाची नोंद मिळते, तिथे ही यंत्रणा मोठ्या लोकांनाही चौकशीसाठी बोलावते. पण केवळ कोणाची ओळख असणे, कोणाला भेटणे किंवा फोटो असणे हा गुन्हा ठरू शकत नाही,” असे केसरकर यांनी नमूद केले. अंधारेंना उत्तर देण्याचे बंधन नाही दीपक केसरकर यांनी पुढे बोलताना सुषमा अंधारे यांच्यावरच निशाणा साधला. “सुषमा अंधारे एक राजकीय व्यक्ती आहेत, त्यामुळे राजकीयदृष्ट्या आम्हाला बदनाम करण्याचा त्या प्रयत्न करणारच. मात्र, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचे बंधन माझ्यावर नाही. एसआयटी आणि ईडी त्यांचे काम करत असून सत्य समोर येईलच. विनाकारण आमची नावे घेणे अत्यंत चुकीचे आहे,” असे म्हणत त्यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले. हे ही वाचा… चाकणकर, खरातच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर कधी चालवणार?:अदिती तटकरे महिला नेत्या म्हणून सक्षम आहेत का? सुषमा अंधारेंचा सवाल महाराष्ट्रात सध्या सुरू असलेले भोंदू अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत असून यात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यात रूपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर काल शिर्डी पोलिस ठाण्यात जाऊन आल्या. बाहेर आल्यानंतर त्यांनी आपल्याला नोटीसच आली नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून अद्यापही रूपाली चाकणकर यांना अटक करण्यासाठी पत्र व्यवहार झालेला नाही, यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *