![]()
राज्यात पुन्हा एकदा मान्सूनने जोरदार पुनरागमन केले असून अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. कोकण, घाटमाथा, नाशिक, मुंबईसह विविध जिल्ह्यांत संततधार सुरू असताना भारतीय हवामान विभागाने पुढील 12 तासांसाठी महाराष्ट्रासह देशातील 18 राज्यांना मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा दिला आहे. काही भागांत ताशी 80 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढणार राज्यातील नाशिक, सातारा, रायगड, रत्नागिरी आणि घाटमाथा परिसरात अतिजोरदार पावसाचा अंदाज असून कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. शेतीला मोठा दिलासा सततच्या पावसामुळे नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून अनेक धरणांमध्येही पाणीसाठा वेगाने वाढत आहे. मुंबई आणि उपनगरांमध्येही रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. मात्र, या पावसामुळे शेतीला मोठा दिलासा मिळाला असून खरीप पिकांना जीवनदान मिळाल्याचे चित्र आहे. या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, पंजाब, उत्तराखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश आणि आसाम या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, नदी-नाल्यांपासून दूर राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित बातमी वाचा.. जायकवाडी ५३%भरले; सेकंदाला १३ लाख लिटर पाणी आवक नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे सध्या जायकवाडीत ४७,४०५ क्युसेक (सुमारे १३ लाख ४२ हजार ३५७ लिटर प्रति सेकंद) वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. अवघ्या ४ दिवसांत तब्बल ४८१.३८ दलघमीहून अधिक पाण्याची आवक झाली आहे. २२ जुलै रोजी ३१ टक्के असलेला उपयुक्त जलसाठा रविवारी (२६ जुलै) रात्री ९ वाजेपर्यंत ५३.४१ टक्क्यांवर पोहोचला आहे. गतवर्षी याच दिवशी हा साठा ७९.२५ टक्क्यांवर होता. एल निनोचे सावट आणि मान्सूनच्या उशिराच्या आगमनानंतरही धरण निम्म्याहून अधिक भरल्याने मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्यासह सिंचन आणि उद्योगांचाही पाणीप्रश्न निकाली निघाला आहे. धरणातील उपयुक्त जलसाठा १,१४४.९०४ दलघमी, तर एकूण जलसाठा १,८८३.०१० दलघमी इतका झाला आहे. गतवर्षी २६ जुलै रोजी धरणाची उपयुक्त पाणीपातळी १७२०.४९ दलघमी (७९.२५%) होती. सविस्तर वाचा गुजरात, आसामात लष्कराने मोर्चा सांभाळला: छत्तीसगड-ओडिशात रेड अलर्ट; बंगालच्या उपसागरात वादळाची शक्यता; आंध्रात ताशी 65KM वेगाने वादळ बंगालचा उपसागर आणि त्याला लागून असलेल्या उत्तर ओडिशा-पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पुढील 24 तासांत चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते. यामुळे आंध्रच्या किनारपट्टीवर ताशी 65 किमी वेगाने वारे वाहू शकतात. हवामान विभागाच्या अंदाजानुसार समुद्रात उंच लाटाही उसळतील. दरम्यान, आसाममध्ये पुराच्या परिस्थितीत थोडी सुधारणा झाली आहे. परंतु यासाठी सेना, एनडीआरएफ (NDRF), एसडीआरएफ (SDRF) आणि पोलीस यांसारख्या अनेक यंत्रणांना बचावकार्यात सहभागी व्हावे लागले.
Source link
राज्यात पुन्हा पावसाचा कहर:कोकण, घाटमाथा, नाशिकसह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा, पुढील 12 तास महत्त्वाचे