Headlines

टँकरमुक्तीसाठी करंदीत प्रथमच बोअर ब्लास्टिंग:पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पाणी पातळी वाढणार, दहा बोअरमध्ये एकाच दिवशी स्फोट‎




नेहमीच टंचाईचा सामना करणाऱ्या पारनेर तालुक्यातील करंदी गावांत टँकरमुक्तीसाठी ग्रामपंचायतीने बोअर ब्लास्ट तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. तलावाजवळ असूनही, जलस्त्रोत असलेल्या विहिरीची पाणी पातळी कमी असल्याचे दिसून आले. तलावाच्या पाणीपातळीप्रमाणे विहिरीची पाणीपातळी वाढवण्यासाठी, रविवारी १० बोअरमध्ये स्फोट घडवण्यात आले. करंदी हे टंचाईग्रस्त गाव असून, या ठिकाणी उन्हाळ्यात टँकरने पाण्याचा पुरवठा करावा लागतो. हा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून या प्रयोगासाठी तरतूद केली. या तंत्रज्ञानाच्या जागृतीसाठी आत्मनिर्धार फाउंडेशन व जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने पुढाकार घेतला. रविवारी हा प्रयोग यशस्वीपणे राबवण्यात आला. यावेळी भूवैज्ञानिक अजिंक्य काटकर, महादेव गवळी, सरपंच एन. बी. गव्हाणे, उपसरपंच अर्जुन ठाणगे, भाऊसाहेब गांगड, पाटीलबा ठाणगे आदी यावेळी उपस्थित होते. या तंत्रज्ञानाचा वापर करून जलस्रोत बळकटीकरणासाठी वित्त आयोगाचा निधी देणारी करंदी राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली. पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या उर्वरित पान ४ ^ पठारीभागात भूगर्भातील खडकांमध्ये सछिद्रता कमी आहे. यामुळे पावसाचे केवळ २ % पाणी भूगर्भापर्यंत पोहोचते. करंदीत, तलावाच्या तुलनेत विहिरीची भूजलपातळी कमी (९ मिटर) असल्याचे निरीक्षण नोंदवले. बोअरमध्ये स्फोट घडवल्यामुळे खडकांमध्ये सछिद्रता निर्माण होऊन अंतर्गत वहन क्षमता वाढते. पर्यायाने तलाव व विहिरीची पाणीपातळी एका लेव्हलला येईल. हा प्रयोग राज्याला दिशादर्शक आहे. – अजिंक्य काटकर, भूवैज्ञानिक.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *