![]()
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंता वाढली होती. पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. मात्र, या अंदाजानंतर काही भागांत अचानक पावसाने हजेरी लावली आहे. कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. मुंबई-पुण्यातही पावसाच्या सरी मुंबईच्या विविध भागांत शुक्रवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. शनिवारी सकाळी पवई आणि आसपासच्या परिसरात रिमझिम पाऊस सुरू होता. काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुण्यातही काही भागांत पावसाने हजेरी लावली. गणेशोत्सवाच्या काळात अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ झाली, तर अनेकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. हवामानातील बदलामुळे पावसाला पोषक स्थिती मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सध्या विस्कळीत झाला आहे. कमी दाबाची प्रणाली निवळल्यानंतर गुजरात परिसरात सुमारे १.५ ते ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय मराठवाड्यापासून कर्नाटकमार्गे अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा विस्तारल्याने काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. आठ दिवसांनी भंडाऱ्यात पाऊस भंडारा जिल्ह्यात तब्बल आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा जोरदार पुनरागमन केले. जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने उकाड्याने नागरिक त्रस्त झाले होते. तसेच पावसाच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरीही चिंतेत होते. अखेर झालेल्या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. विदर्भात पावसाची प्रतीक्षा कायम भंडाऱ्यासह काही भागांत पाऊस झाला असला तरी संपूर्ण विदर्भात परिस्थिती सारखी नाही. अनेक भागांमध्ये अजूनही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे. स्थानिक पातळीवर काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे. मात्र, काही भागांत तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता असल्याने उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे. दुष्काळाचे संकट कायम राज्यात यंदा अनेक भागांत पावसाने अपेक्षित साथ दिलेली नाही. काही ठिकाणी सुरुवातीला चांगला पाऊस झाला असला तरी त्यानंतर दीर्घ विश्रांती घेतल्याने शेतीपिकांवर परिणाम झाला आहे. मराठवाड्यासह राज्यातील काही भागांमध्ये पाण्याची उपलब्धता आणि पिकांची स्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे अचानक झालेला पाऊस दिलासा देणारा असला तरी दुष्काळाचे सावट अद्याप पूर्णपणे दूर झालेले नाही. पुढील दिवस महत्त्वाचे राज्यातील पावसाची स्थिती पुढील काही दिवसांत कशी राहते, याकडे शेतकरी आणि प्रशासनाचे लक्ष लागले आहे. सध्या काही भागांत पावसाने हजेरी लावली असली तरी त्याचे वितरण सर्वत्र समान नाही. त्यामुळे पिकांना आवश्यक असलेला सातत्यपूर्ण पाऊस मिळतो का, यावर शेतीचे पुढील चित्र अवलंबून राहणार आहे. महिनाभराच्या खंडानंतर पुनरागमन: 6 जिल्ह्यांमध्ये पाऊस; 20 मंडळांत अतिवृष्टी, संभाजीनगर जिल्ह्यास हुलकावणी धरणसाठ्यात वाढ नसल्याने टंचाईची टांगती तलवार, सप्टेंबरअखेर दमदार पावसाचा अंदाज छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर बीड,लातूर, धाराशिव, नांदेड, आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली.परभणीत १३, बीडला ५ तर लातूरला २ अशा एकूण २० मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. यापावसामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे. तरी धरणांचा साठा अद्याप वाढलेला नाही. हिंगोली : जिल्ह्यात सरासरी ३७मिमी पावसाची शुक्रवारी नोंद जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे झालेल्या दमदारपावसामुळे सोयाबीन वगळता इतर पिकांनाचांगला फायदा होणार आहे. जिल्ह्याचे प्रमुखपीक समजल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकाच्याशेंगा भरण्याच्या अवस्थेतच पाऊस नसल्यामुळेया पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळेनाल्यांना काही प्रमाणात पूर आल्याचे चित्र होते.जिल्ह्यामध्ये सरासरी ३७ मिलिमीटर पाऊसझाला. या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. बीड : सिरसाळा मंडळात ११२मिमी, ५ मंडळांमध्ये अतिवृष्टी जिल्ह्यातील ८६ पैकी ५ महसूल मंडळांमध्येगुरुवारी अतिवृष्टीची नोंद झाली.अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर (७९.५मिमी) व बर्दापूर (७७.८ मिमी) मंडळांचासमावेश आहे. तसेच परळी तालुक्यातीलपरळी (८८ मिमी), सिरसाळा (११२.५मिमी) आणि पिंपळगाव गाढे (१०७ मिमी)या मंडळांमध्येही जोरदार पाऊस झाला.जुलै ते सप्टेंबर या कालावधीत अनेकतालुक्यांत पावसाचा मोठा खंड पडला.त्यामुळे पिकांवर विपरीत परिणाम झालाआहे. यामुळे उत्पादनात घट होण्याची भीतीशेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. लातूर : तेरणा, रेणा नद्या यंदापावसाळ्यात प्रथमच प्रवाहित जिल्ह्यात ४२ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सर्वचतालुक्यांमध्ये पावसाने मध्यरात्री हजेरीलावली. लातूर (८३ मिमी) आणि रेणापूरमंडळा ७९ मिमी अतिवृष्टीची नोंद झाली.या पावसामुळे तेरणा आणि रेणा या दोन्हीनद्या प्रथमच प्रवाहित झाल्या. यापावसामुळे कोमजलेल्या पिकांना दिलासामिळाला आहे. सर्वच तालुक्यांमध्ये पावसानेहजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनादिलासा मिळाला असला, तरी आगामीकाळातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमआहे. त्यामुळे आणखी दमदार पावसाचीप्रतीक्षा आहे. परभणीत १३ मंडळात अतिवृष्टी : जिल्ह्यात शुक्रवारी सरासरी ५५.८ मिमी पाऊस झाला. १३मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. परभणी तालुक्यात ९५.८ मिमी, गंगाखेडमध्ये ३५.१, पाथरीत ४३.१,जिंतूरमध्ये ५२.१, पूर्णा तालुक्यात ४२.७, पालममध्ये ३७.४, सेलूत ३१.६, सोनपेठ ७९.५, तर मानवत तालुक्यात६५.६ मिमी पावसाची नोंद झाली. झरी येथे १११.५ मिमी, सोनपेठ तालुक्यातील सोनपेठ येथे ९२ मिमी, मानवततालुक्यातील रामपुरी येथे ८८ मिमी, तर जिंतूर तालुक्यातील वाघी धानोरा येथे ६२.५ मिमी पाऊस झाला.
हिंगोलीत अकोला बायपासवर शुक्रवारी दुपारी मुसळधार पावसामुळे काही अंतरावरील दिसणेही कठीण झाले. नांदेड : ५ दिवसांच्या अंतराने पुन्हापाऊस, अर्धापुरात सर्वाधिक ४७ मिमी जिल्ह्यात महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर दमदार पाऊसझाला. शुक्रवारी जिल्ह्यात सरासरी १९.५० मिमीपाऊस झाला. हिमायतनगर तालुक्यात सर्वाधिक४७.७० मिमी पावसाची नोंद झाली आहे.त्यापाठोपाठ अर्धापूर तालुक्यात ४२.२०, हदगाव३६.९०, बिलोली ३३.२०, भोकर ३०.५०,मुखेड२७.४०, नांदेड १७.३०, धर्माबादमध्ये २१.७०, उमरी१७.९०, कंधार १६.४०, लोहा ११.६०, देगलूर ६.८०,नायगाव ६.३०, किनवट ६.४० आणि माहूरला ४६मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढे काय? १९ ते २३ सप्टेंबरदरम्यान हलका पाऊस छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये १९ ते २३ सप्टेंबर या काळात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. तसेचकाही भागात वादळी सरी कोसळण्याची शक्यता आहे. २४ सप्टेंबरनंतर बंगाल उपसागरातकमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत असल्याने २४ ते ३० सप्टेंबरदरम्यान पावसाचा जोर वाढेल. देशातील प्रमुख शहरांचे तापमान ———– ही बातमी पण वाचा.. आजपासून राजस्थानातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू:यूपीच्या गोंडात 10 हजार जणांना पुराचा विळखा; महाराष्ट्रात वीज कोसळून 5 ठार देशभरात आता मान्सूनचा प्रभाव ओसरू लागला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज राजस्थानच्या पश्चिम भागातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि मध्य प्रदेशातून माघार घेईल. पुढे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या उर्वरित भागांतून बाहेर पडत तो कमकुवत होईल आणि संपूर्ण देशातून माघार घेईल. सविस्तर वाचा
Source link
महाराष्ट्रात पुन्हा पावसाची हजेरी:मुंबई-पुण्यासह अनेक भागांत संततधार; सप्टेंबर अखेर दमदार पावसाचा अंदाज