Headlines

महाराष्ट्राच्या 'गोंधळ'ला ऑस्करचे नामांकन:दिग्दर्शक संतोष डावखर म्हणाले- ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केल्यासारखी भावना




अकरा वर्षांपूर्वी ‘कोर्ट’ चित्रपटाने मिळवलेला मान आता पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीच्या पदरात पडला आहे. महाराष्ट्राच्या जिवंत लोकपरंपरेचे दर्शन घडवणाऱ्या ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची ९९व्या अकादमी पुरस्कारांसाठी (ऑस्कर) भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. या ऐतिहासिक यशानंतर चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता संतोष डावखर यांनी अत्यंत भावूक होत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केल्यासारखी भावना’ या सन्मानाबद्दल बोलताना संतोष डावखर म्हणाले, “लहानपणापासून ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंकडे आम्ही अभिमानाने पाहात आलो आहोत. आज ‘गोंधळ’च्या माध्यमातून जागतिक व्यासपीठावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे, हा क्षण आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा, भावनिक आणि ऐतिहासिक आहे. हा केवळ एका चित्रपटाचा गौरव नसून भारतीय संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील कथेचा सन्मान आहे. तगड्या स्पर्धेत ‘गोंधळ’ची बाजी ऑस्करच्या शर्यतीत ‘धुरंधर-१’, ‘धुरंधर-२’, ‘इक्कीस’, ‘बॉर्डर २’, ‘बायसन’, ‘देऊळबंद २’ आणि ‘द शेप ऑफ मोमो’ यांसारखे विविध भाषांतील मोठे व बजेट असलेले चित्रपट शर्यतीत होते. मात्र, चित्रपटाचा मूळ भारतीय गाभा, आंतरराष्ट्रीय दर्जाची सिनेमॅटिक भाषा आणि तांत्रिक गुणवत्तेच्या जोरावर फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या (FFI) ज्युरीने ‘गोंधळ’वर विश्वास दाखवला. जागतिक अभियानाची तयारी पूर्ण चित्रपटाच्या पुढील प्रवासाबद्दल सांगताना त्यांनी स्पष्ट केले. ऑस्करच्या शर्यतीत भारताचे प्रतिनिधित्व अत्यंत ताकदीने करण्यासाठी सक्षम रोडमॅप तयार करण्यात आला आहे. पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार: ‘गोंधळ’ हा चित्रपट लवकरच पाच भारतीय भाषांसह जगभरात प्रदर्शित केला जाणार असून, त्याच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. प्रेक्षकांना खास आवाहन: चित्रपटाची भव्य दृश्यभाषा आणि जिवंत ध्वनी मोठ्या पडद्यावरच अनुभवण्यासारखी आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी पायरीसीचा मार्ग न निवडता चित्रपटगृहात जाऊनच हा चित्रपट पाहावा आणि ऑस्कर प्रवासाचा भाग व्हावे. हा विजय संपूर्ण ‘गोंधळ’ टीम, कुटुंब आणि सहकाऱ्यांच्या मेहनतीचे फळ असल्याचे सांगत, भारत सरकार आणि निवड समितीचे डावखर यांनी आभार मानले आहेत. ————— ही बातमी पण वाचा.. मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची ऑस्करसाठी भारताकडून अधिकृत एंट्री:धुरंधर, बॉर्डर 2, हनुमान अंश यांना टाकले मागे, लोकपरंपरेवर आधारित आहे कथा 99 व्या अकादमी पुरस्कारांसाठी (ऑस्कर 2027) ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने (FFI) शुक्रवारी ही घोषणा केली. मराठी लोकपरंपरेवर आधारित असलेला हा थ्रिलर चित्रपट ऑस्करसाठी ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट’ या श्रेणीत सादर केला जाईल. यावर्षी ऑस्करच्या शर्यतीत भारताकडून ‘धुरंधर’, ‘बॉर्डर 2’ आणि ‘हनुमान अंश’ यांसह 33 चित्रपटांनी प्रवेशिका दाखल केल्या आहेत. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *