![]()
राज्यात खळबळ उडवणाऱ्या बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी एसआयटीने मोठी कारवाई केली आहे. जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णीचा भाजप नेता व १५ शाळांचा संचालक संजय गरुड याला सोलापूरजवळील नातेपुते येथून सोमवारी ताब्यात घेतले. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. गरुड याने संस्थेतील १७७ शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी एकाच दिवसात तयार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या संशयास्पद आयडींच्या आधारे मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. सखोल तपासासाठी गरुडला मंगळवारी नाशिक न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीची मागणी केली जाणार आहे.
Source link
शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये भाजप नेता संजय गरुड सोलापुरातून ताब्यात:15 शाळांचा संचालक, आज काेर्टात हजर करणार