![]()
साक्री–शिर्डी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२-जीवरील सटाणा शहरातून जाणारा जिजामाता उद्यान ते सटाणा बसस्थानकादरम्यानचा रस्ता मोठ्या प्रमाणात खड्डेमय झाल्याने वाहनचालकांसह नागरिकांचे हाल होत आहेत. पावसाळ्यामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नसून, अपघाताचा धोका वाढला आहे. या समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या वतीने सोमवारी (दि. २७) तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील पाण्याचे प्रतिकात्मक जलपूजन करून शासनाचा निषेध व्यक्त केला. त्यानंतर स्वखर्चाने खड्डे बुजविण्याचा उर्वरित पान ४ १८ मीटर लांबीमुळे चौपदरीकरणास अडचण ^चौपदरी रस्त्यासाठी २२ मीटर लांबी लागते ती १८ मीटर आहे. त्यामुळे चौपदरी करायला अडचण आहे. शहराला बायपासशिवाय प्रर्याय नाही, शासनाकडे प्रस्ताव पाठवले आहेत. मंजुरी मिळाल्यावर रस्ता काम होईल. सध्या पावसाचे दिवस आहेत, त्यामुळे डांबरीकरण शक्य नाही. -परमेश्वर सुतार, उप अभियंता. इशाऱ्यानंतर तरी रस्ता दुरूस्त होणार का? रस्त्याच्या दुरवस्थेमुळे परिसरातील व्यापारी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या इशाऱ्यानंतर तरी प्रशासन जागे होऊन रस्ता दुरुस्तीला सुरुवात करेल का, अशी चर्चा सुरू आहे. अन्यथा या खड्ड्यांमध्येच वाहनचालकांना जलसमाधी घ्यावी लागेल, अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली.
Source link
सटाण्यात खड्ड्यांचे जलपूजन करून राष्ट्रवादीची स्वखर्चाने रस्ता दुरूस्ती:1 ऑगस्टपर्यंत काम सुरून झाल्यास रास्ता रोको