.

माढा शहरात सुरू असलेल्या प्रशासकीय इमारतीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू असून इमारतीच्या बांधकामाला ठिकठिकाणी मोठमोठे तडे पडले आहेत. सर्वच शासकीय कार्यालये एकाच छताखाली व्हावीत, यासाठी माजी आमदार बबनराव शिंदे यांनी विशेष पाठपुरावा करून जुन्या तहसील कार्यालयाच्या ठिकाणी नव्या प्रशासकीय इमारतीला मंजुरी मिळवली. स्व. अजित पवार यांच्या माध्यमातून प्रशासकीय इमारतीला मान्यता मिळवून पहिल्या टप्प्यात १३ कोटी २० लाखांचा निधी मंजूर करून आणला आणि कामाला सुरुवात झाली. मात्र ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचा झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते शंभू साठे यांनी केली आहे . या संदर्भातील तक्रारीचे निवेदन सत्यशोधक बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयास दि. २७ जुलै रोजी दिले असल्याचे सांगण्यात आले.
इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ठिकठिकाणी आतील आणि बाहेरील बाजूस तडे गेलेले आहेत. केलेल्या बांधकामाला पाणी न मारल्याचा प्रकार समोर आला आहे. तळमजला ७१७, पहिला मजला १८२८, दुसरा मजला १७०० असे एकूण ४ हजार २४४ स्क्वे. मीटरचे बांधकाम सुरू आहे. याचे काम ‘शिवम कन्स्ट्रक्शन, लातूर’ हे करीत आहेत. विकासकामे पाठपुरावा करून मंजुरी मिळवल्यानंतर त्यासाठी आलेल्या विकासनिधीतून कामे कशा पद्धतीने व कोणत्या दर्जाची होत आहेत का, हे पाहण्याची तितकीच जबाबदारी आणि कर्तव्य लोकप्रतिनिधीचे असते. मात्र माढ्यातील लोकप्रतिनिधी विसरल्याचे दिसत असून सा. बा. विभागाचे अधिकारी सोयीस्कर डोळेझाक करताना दिसत आहेत.
माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांनी पाठपुरावा करून १३ कोटी २० लाखांचा निधी मंजूर तळमजला आणि वर दोन अशी ३ मजली इमारत उभी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या इमारतीत तळमजल्यामध्ये पोलीस कोठडी (शासकीय कोठडी – सबजेल) आणि स्टेट बँकेचे ग्राहक केंद्र उभारले जाणार आहे. तर उर्वरित २ मजल्यांवर तहसीलदार कक्ष, तहसील कार्यालयातील सर्व विभागांचे कक्षनिहाय कार्यालय, कृषी विभाग, दुय्यम निबंधक, भूमी अभिलेख, वन विभागासह इतर कार्यालयांचा कारभार चालवला जाणार आहे. ^प्रशासकीय इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. संबंधित ठेकेदारासोबत सा. बा. विभागाचे अधिकारी आणि सर्वच लोकप्रतिनिधींनी केलेली डोळेझाक चुकीची आहे. काम व्यवस्थित झाले नसून या निकृष्ट कामाविरोधात जनआंदोलन उभे केले जाईल. शंभू साठे, सामाजिक कार्यकर्ते, माढा ^तळमजल्याचे काम सुरू असताना आजी-माजी आमदार एकदा आले होते. मात्र आता दोन्ही मजल्यांचे काम अंतिम टप्प्यात आले असताना कुणीही आलेले नाही. सांगितलेल्या कामाच्या चुका दुरुस्त करून घेतल्या जातील. शेख, अभियंता, शिवम कन्स्ट्रक्शन, लातूर मंजूर करून आणला. तर माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सुधारित मान्यता घेऊन ५ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर करून आणला आहे. यापैकी १३ कोटींचा निधी संबंधित ठेकेदाराला सा. बा. विभागाकडून वितरीत केला आहे. तरीही काम निकृष्ट होत असल्याचा आरोप करण्यात आला. ^मी एक महिना झाला चार्ज घेतला आहे. माढ्यातील प्रशासकीय इमारतीला मी दोनदा भेट दिली आहे, मात्र वरच्या दोन मजल्यांवर गेलो नाही हे मी मान्य करतो. काही ठिकाणी निकृष्ट झालेले काम दुरुस्त करून घेतले जाईल. मी कामाची जबाबदारी स्वीकारतो. — मेटकरी, सा. बा. उपविभाग अभियंता, कुर्डूवाडी