Headlines

Nana Patole Slams BJP Govt Over Delhi Youth Protest


शेतकऱ्यांना जसे उद्ध्वस्त केले, तसेच देशातील तरुणांनाही बरबाद करण्याचा संकल्प भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केला आहे. दिल्लीत तरुणांनी केलेले आंदोलन हे सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच झाले आहे. त्यामुळे आंदोलक तरुणांवर गुन्हे दाखल करण्याऐवजी

.

नाना पटोले म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ खेळला जात असल्यानेच संतप्त तरुणांनी दिल्लीत आंदोलन छेडले. या आंदोलनात काही समाजकंटक घुसले असण्याची शक्यता आहे. आंदोलनस्थळी असणारे तरुणच सांगत आहेत की, तिथे भाजप आणि आरएसएसचे लोक घुसले होते. या आंदोलनाला काळीमा फासण्याचा आणि ते बदनाम करण्याचा प्रयत्न भाजप आणि आरएसएसकडून करण्यात आल्याचे मोर्चेकऱ्यांनी सांगितल्याचे पटोले म्हणाले.

तरुणांचे भविष्य अधिक महत्त्वाचे

शरद पवार यांचा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चेबाबत विचारले असता पटोले म्हणाले, कोण कोणत्या पक्षात चालले आहे, यापेक्षा आम्हाला देशातील तरुणांचे प्रश्न अधिक महत्त्वाचे वाटतात. ज्या पद्धतीने आंदोलन करणाऱ्या तरुणांवर पॅलेट गन आणि एके-47 सारख्या शस्त्रांचा वापर करण्यात आला, त्यांना ‘शहरी नक्षलवादी’ आणि ‘दहशतवादी’ घोषित करण्याचा प्रयत्न केला गेला, हे अत्यंत गंभीर आहे. पूर्वी शेतकऱ्यांनी हक्कासाठी आंदोलन केले की त्यांना अतिरेकी म्हटले जायचे. आता तरुणांनी आपल्या भविष्यासाठी आवाज उठवला की त्यांना शहरी नक्षलवादी ठरवले जात आहे. सरकारचा हा हुकूमशाही दृष्टिकोन आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे. आपण 75 वी लोकशाही साजरी करतोय. जंतर मंतरवर आपण पाहिले की या तरुणांनी राग व्यक्त केला आहे. तिथे राहुल गांधी का गेले नाही, असा प्रश्न विचारला जातोय, त्याला राजकीय रंग द्यायचा नव्हता म्हणून ते तिथे गेले नव्हते.

हे ही वृत्त वाचा

CJP म्हणाली- सर्व आंदोलकांवरील FIR रद्द होणार:मध्यरात्री 1 वा. व्हिडिओ जारी करून म्हटले- सरकारशी चर्चा, आंदोलक सुरक्षित राहतील

कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने सांगितले की, सर्व आंदोलकांवरील FIR मागे घेतले जातील. CJP प्रवक्ते सौरव दास आणि रत्ना यांनी सोमवारी मध्यरात्री 1 वाजता व्हिडिओ जारी करून ही माहिती दिली.

सौरवने सांगितले की, सरकारचे प्रतिनिधी (दिल्ली पोलिसांचे अधिकारी) भेटायला आले होते. आम्ही त्यांना सांगितले की, सरकारने जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण होणार नाहीत अशी भीती आहे. त्यांनी बिहार सरकारच्या गृह विभागाची प्रेस रिलीज दाखवली. त्यात लिहिले आहे की, सर्व आंदोलकांवरील FIR मागे घेतले जातील आणि भविष्यातही कोणती कारवाई केली जाणार नाही. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.