Headlines

सुमार कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांवर कुऱ्हाड?:एकनाथ शिंदेंनी बोलावली सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक, 'खातेबदला'च्या चर्चेला उधाण




केंद्रात शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा, ‘नीट’ व ‘एमपीएससी’ (MPSC) पेपरफुटीवरून तापलेले राजकारण आणि कॉकरोच जनता पक्षाच्या (CJP) आंदोलनांमुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. या वाढत्या राजकीय दबावाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी अलर्ट मोडवर आले आहेत. आमदारांच्या तक्रारी आणि आगामी आव्हाने लक्षात घेता, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची आढावा बैठक बोलावली आहे. या बैठकीत मंत्र्यांच्या गेल्या दीड वर्षांतील कामकाजाचा ‘रिपोर्ट कार्ड’ पाहिला जाणार असून, सुमार कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांवर कठोर कारवाई किंवा मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या (Cabinet) नियमित बैठकीनंतर लगेचच ही विशेष बैठक पार पडणार आहे. मंत्रालयातील सातव्या मजल्यावरील समिती सभागृहात ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. शिवसेनेच्या प्रत्येक मंत्र्यांच्या विभागाचा गेल्या दीड वर्षांतील कामकाजाचा सविस्तर अहवाल या बैठकीत तपासला जाईल. केवळ कागदोपत्री निर्णय किंवा घोषणांची माहिती न घेता, त्या निर्णयांची प्रत्यक्ष जमिनीवर कितपत अंमलबजावणी झाली, याची झाडाझडती एकनाथ शिंदे घेणार असल्याचे समजते. विकसित महाराष्ट्र-2047′ आणि आमदारांच्या तक्रारी या बैठकीमागे शिवसेनेच्या आमदारांची नाराजी आणि प्रशासकीय उद्दिष्टे ही दोन मुख्य कारणे असल्याचे मानले जात आहे. राज्य सरकारच्या ‘विकसित महाराष्ट्र-2047’ या उपक्रमांतर्गत सन 2026-27 या वर्षासाठी विविध विभागांना देण्यात आलेल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेचा आढावा या बैठकीत घेतला जाईल. मतदारसंघांतील कामे तुंबल्याने आमदार नाराज शिवसेनेच्या अनेक आमदारांनी आपल्या मतदारसंघातील विकासकामे संबंधित मंत्र्यांच्या विभागांकडून वेळेत होत नसल्याच्या तीव्र तक्रारी एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्या होत्या. आमदारांच्या याच नाराजीची गंभीर दखल घेत शिंदेंनी मंत्र्यांची ही बैठक बोलावली आहे. मंत्रिमंडळ फेरबदलाची टांगती तलवार! राजकीय वर्तुळात शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये किंवा मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. शिंदे यांनी सर्व मंत्र्यांना आपल्या विभागाचे निर्णय, योजना आणि त्यांच्या अंमलबजावणीचे सविस्तर अहवाल घेऊन बैठकीस उपस्थित राहण्याच्या कडक सूचना दिल्या आहेत. या आढाव्यात ज्या मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक आढळणार नाही, त्यांच्याबाबत एकनाथ शिंदे काही मोठे आणि कठोर निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या बैठकीत शिंदे आपल्या मंत्र्यांना काय आदेश देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याच्या चर्चांनीही राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. अशा परिस्थितीत होणाऱ्या या बैठकीकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीत कामगिरी समाधानकारक नसलेल्या मंत्र्यांबाबत कठोर भूमिका घेतली जाऊ शकते. त्यामुळे या बैठकीनंतर काही महत्त्वाचे राजकीय निर्णय किंवा संघटनात्मक बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता या बैठकीत एकनाथ शिंदे मंत्र्यांना नेमक्या कोणत्या सूचना देतात, कामकाजाबाबत कोणती दिशा ठरवतात आणि पुढील काळात मंत्रिमंडळात काही बदल होतात का, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. हेही वाचा… ‘नीट’नंतर राज्यात MHT-CET मध्येही घोटाळ्याचा आरोप : बारावीत 40 टक्के अन् सीईटीत 99 पर्सेंटाईल कसे? शिक्षकाचा व्हिडिओतून गंभीर दावा देशभरात गाजलेल्या ‘नीट’ पेपरफुटीच्या वादात ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आक्रमक आंदोलनामुळे थेट केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. दिल्लीतील ही धग शांत होण्यापूर्वीच, आता महाराष्ट्रात ‘एमएचटी-सीईटी’ (MHT-CET 2026) परीक्षेत ‘नीट’पेक्षाही मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत, आमदार रोहित पवार यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते महादेव बालगुडे यांनी एका शिक्षकाचा व्हिडिओ समोर आणत परीक्षा यंत्रणेच्या विश्वासार्हतेवरच मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. “बारावीत जेमतेम पास झालेल्या विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये १०० पर्सेंटाईल कसे मिळाले?” या एका प्रश्नाने आणि पैशांचा वापर करून गुण वाढवल्याच्या दाव्याने सध्या राज्याच्या शिक्षण वर्तुळात भूकंप आणला आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *