Headlines

MPSC Drugs Inspector Exam Controversy; Mehboob Shaikh Raises Serious Allegations


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या भरती प्रक्रियेतील संशयाचे धुके अधिकच गडद झाले आहे. या परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप करत आमदार रोहित पवार यांनी यापूर्वीच आक्रमक भूमिका घेतली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षा

.

नेमका प्रकार काय?

मेहबूब शेख यांनी उघड केलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2025 मध्ये ‘FDA केमिकल अ‍ॅनालिस्ट’ आणि ‘DMER फार्मासिस्ट ग्रुप सी’ या परीक्षा पार पडल्या होत्या. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांनी, म्हणजेच मार्च 2026 मध्ये ‘ड्रग्ज इन्स्पेक्टर’ या पदासाठी परीक्षा घेण्यात आली. या दोन्ही परीक्षांच्या निकालांची तुलना केली असता, काही विद्यार्थ्यांच्या कामगिरीत झालेला बदल हा चक्रावून टाकणारा आहे.

शेख यांनी दिलेली ‘त्या’ तीन विद्यार्थ्यांची संशयास्पद उदाहरणे

1) पायल लांडे

FDA Chemical Analyst – 72 गुण | Rank 10210

Drugs Inspector – Rank 31

2) ऋतुजा अमृत पाटील

DMER Pharmacist Group C – 94 गुण | Rank 21222

Drugs Inspector – 155 गुण | Rank 7

3) सागर रामलिंग थिटे

DMER Pharmacist Group C – 94 गुण | Rank 21160

Drugs Inspector – 150 गुण | Rank 14

सत्ताधाऱ्यांसोबतचे फोटो आणि चौकशीवर प्रश्नचिन्ह

अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत हजारोंच्या रँकमधून थेट राज्यातील अव्वल क्रमांकापर्यंत मारलेली ही मजल विद्यार्थ्यांच्या मनात गंभीर प्रश्न निर्माण करत असल्याचे शेख यांनी म्हटले आहे. याशिवाय, रडारवर असलेल्या या उमेदवारांचे राज्याचे मुख्यमंत्री आणि सत्ताधारी पक्षातील काही बड्या लोकप्रतिनिधींसोबतचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. “केवळ फोटो किंवा ओळख यावरून कोणालाही दोषी ठरवता येत नाही. मात्र, या सगळ्या प्रकारामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी खरोखरच निष्पक्ष होईल का? आणि सामान्य विद्यार्थ्यांना न्याय मिळेल का?” असा सवाल मेहबूब शेख यांनी उपस्थित केला आहे.

मेहबूब शेख यांच्या प्रमुख मागण्या:

प्रामाणिकपणे आणि मेहनत करून अभ्यास करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी मेहबूब शेख यांनी राज्य सरकार आणि आयोगासमोर खालील स्पष्ट मागण्या ठेवल्या आहेत:

‘Drugs Inspector’ परीक्षेची अत्यंत स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी तत्काळ करण्यात यावी. आवश्यक असल्यास या संपूर्ण प्रक्रियेचे डिजिटल फॉरेन्सिक ऑडिट , सर्व्हर लॉग्स आणि इतर तांत्रिक बाबींची सखोल तपासणी केली जावी. विद्यार्थ्यांचा यंत्रणेवरील विश्वास कायम राहावा यासाठी, या चौकशीचा अंतिम अहवाल जनतेसाठी सार्वजनिक करण्यात यावा.

“आमचा कोणत्याही उमेदवाराविरुद्ध वैयक्तिक आक्षेप नाही. आम्ही कोणालाही दोषी ठरवत नाही, पण न्याय मागणे आणि प्रश्न विचारणे हा विद्यार्थ्यांचा घटनात्मक अधिकार आहे,” असे शेख यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी स्पष्ट केले आहे. या नव्या खुलाशामुळे आता MPSC आणि राज्य सरकार यावर काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा…

‘नीट’नंतर राज्यात MHT-CET मध्येही घोटाळ्याचा आरोप : बारावीत 40 टक्के अन् सीईटीत 99 पर्सेंटाईल कसे? शिक्षकाचा व्हिडिओतून गंभीर दावा

देशभरात गाजलेल्या ‘नीट’ पेपरफुटीच्या वादात ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आक्रमक आंदोलनामुळे थेट केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. दिल्लीतील ही धग शांत होण्यापूर्वीच, आता महाराष्ट्रात ‘एमएचटी-सीईटी’ (MHT-CET 2026) परीक्षेत ‘नीट’पेक्षाही मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत, आमदार रोहित पवार यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते महादेव बालगुडे यांनी एका शिक्षकाचा व्हिडिओ समोर आणत परीक्षा यंत्रणेच्या विश्वासार्हतेवरच मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. “बारावीत जेमतेम पास झालेल्या विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये १०० पर्सेंटाईल कसे मिळाले?” या एका प्रश्नाने आणि पैशांचा वापर करून गुण वाढवल्याच्या दाव्याने सध्या राज्याच्या शिक्षण वर्तुळात भूकंप आणला आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.