![]()
महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या साखर उद्योगात आता यांत्रिकी युग आले आहे. ‘कोयत्याची’ जागा आता ‘हायड्रॉलिक कटर्स’ने घेतली आहे. कधीकाळी लाखो ऊसतोडणी मजुरांच्या कष्टावर चालणारा गळीत हंगाम आता ‘शुगरकेन हार्वेस्टर’ च्या आधारावर चालतो आहे. सध्या राज्यात ३,००० ‘हार्वेस्टर’ ऊस कापत आहेत. ग्रामीण भागातील युवकांनी यासाठी ३,५०० कोटींची गुंतवणूक केली आहे. राज्यात ७०% ऊसतोडणी हार्वेस्टरने होत आहे. यामुळे मजुरांना अन्य कामे शोधावी लागत आहेत. दहा जणांची टीम करते काम: हंगाम सुरू असताना हे मशीन दिवस-रात्र अशा दोन शिफ्टमध्ये काम करते. एका मशीनसाठी ऑपरेटर, ड्रायव्हर आणि हेल्पर मिळून १० जणांची टीम यामध्ये कार्यरत असते. म्हणजेच, मजुरांना मिळणारा रोजगार गेला पण यांत्रिक कौशल्यावर आधारित नव्या रोजगारही मिळतो आहे. 1. फक्त ५ महिने हंगाम नोव्हेंबर ते मार्चपर्यंत ५ महिने हंगाम असतो. उर्वरित ७ महिने मशीन बंद असते. म्हणजे वर्षभराच्या कर्जांच्या हप्त्यांची सोय ५ महिन्यांतच करून ठेवावी लागते. ऊस लागवडीचे क्षेत्र पाहता सध्या ३००० हार्वेस्टर हंगामासाठी पुरेसे आहेत. 2.यंदा ‘एल निनो’चे सावट गतवर्षी ५०० नव्या मशिन्सची खरेदी झाली होती. यंदा मात्र चित्र थोडे चिंताजनक आहे. ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पाऊस कमी आहे.त्यामुळे नव्या मशिन्सची खरेदी १०० ते १५० च्या आसपास राहण्याची शक्यता आहे. ३. मुकादम बनले मालक : कारखानेही मशिन्स खरेदी करत आहेत अथवा सभासदांना मशीनसाठी कर्ज मिळवून देत आहेत. योग्य व्यवस्थापन असेल तर यश मिळते हार्वेस्टर म्हणजे छोटी कंपनीच आहे. यात व्यवस्थापन, मनुष्यबळ हाताळणी, मेंटेनन्स करणे ज्यांना जमते, तेच यशस्वी होतात. अन्यथा तोटाही सहन करावा लागतो. नवनाथ गिते, मशीनमालक हार्वेस्टरच्या किमती कमी करणे गरजेचे यंत्र शेतकरी व कारखानदारांसाठी फायद्याचे आहे. मात्र, सबसिडीच्या आडून नफेखोरी करणाऱ्या हार्वेस्टर कंपन्यांवर सरकारने चाप लावावा. हार्वेस्टरच्या किमती कमी कराव्यात. – प्रभाकर शिंदे, पंचगंगा शुगर्स. १०० मजुरांचे काम एकाच दिवसात फत्ते हार्वेस्टर आता केवळ शेतीचे अवजार राहिले नसून युवकांसाठी एक ‘चालती-बोलती कंपनी’ बनली आहे. काही अडथळा नसेल तर हे मशीन दिवसाला १५० टन ऊस तोडते. पूर्वी १०० मजुरांचा ताफा लागायचा, ते काम आता हे यंत्र काही तासांत फत्ते करून टाकते. यामुळे मजुरांचे स्थलांतर तर थांबलेच. शिवाय मुकादमांकडून होणारा छळही थांबला आहे. दुसऱ्या बाजूला मजुरांअभावी त्रस्त कारखानदारांनाही दिलासा मिळतो आहे.
Source link
ऊसतोडणी यंत्रांवर राज्यभरात 3,5 हजार कोटींची गुंतवणूक:एक यंत्र करते 100 ऊसतोड मजुरांचे काम, यंत्र बनले ग्रामीण अर्थकारणाचा मजबूत पाया