![]()
‘एक नंबर आहे एक नंबर, छत्रपती संभाजीनगर..!’ हे गीत सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत कर्कश आवाजात कानी पडते. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या घंटागाड्यांच्या भोंग्याचा हा आवाज आहे. ‘झीरो वेस्ट’साठी फिरणारी ही वाहने शहरात प्रचंड ध्वनी प्रदूषण करत आहेत. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ अर्थात एमपीसीबीने सर्व प्रकारच्या ध्वनिक्षेपकांसाठी ५५ डेसिबलची मर्यादा घालून दिली आहे. प्रत्यक्षात मात्र या घंटागाड्या सरासरी ८४ डेसिबलपर्यंतचा आवाज करत आहेत. यामुळे नियमांचे उल्लंघन होत आहे. महानगरपालिकेने शहरात कचरा संकलनासाठी सुरू केलेल्या नव्या घंटागाड्या पर्यावरणपूरक असण्याऐवजी ‘ध्वनी प्रदूषण’ करणाऱ्या एक्स्प्रेस बनल्या आहेत.
Source link
ध्वनी प्रदूषणाची घंटागाडी:मर्यादा 55 डेसिबलची, भोंग्याचा आवाज 84 डेसिबल; कर्णकर्कश गाण्याने नागरिकांची मोडतेय झोपत्रास