Headlines

Rohit Pawar Exposes Fake Degree Racket at SPPU Pune


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (SPPU) उघडकीस आलेल्या बोगस पदवी आणि गुणपत्रिकेच्या प्रकरणावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कुलगुरूंची भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्

.

केवळ एका कर्मचाऱ्यावर कारवाई करून भागणार नाही’

विद्यापीठातील कर्मचारी अतुल मुखेकर याला निलंबित करून आणि त्याच्यावर एफआयआर (FIR) दाखल करून हे प्रकरण संपणार नाही. मुखेकर हा 2016 पासून या विभागात कार्यरत आहे. एका छोट्या कर्मचाऱ्याला एवढे मोठे धाडस कधीही करता येत नाही; यामागे मोठे रॅकेट असून वरिष्ठ पातळीवरील अधिकारी आणि राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे शक्य नाही.

2015 पासूनचे ऑडिट करा

एका विद्यार्थ्याची बोगस डिग्री समोर आली असली, तरी अशा शेकडो डिग्र्या विकल्या गेल्या असण्याची शक्यता आहे. त्यामुळे 2015 पासून आजपर्यंत विद्यापीठाने दिलेल्या सर्व पदव्या, पीआरएन (PRN), एनरोलमेंट आणि सीट नंबरचे सखोल ऑडिट व्हावे. नव्याने प्रिंट झालेल्या पदव्या कोणाकोणाला दिल्या गेल्या, याची चौकशी व्हावी.

आरोपी मुखेकर याचा मोबाईल जप्त करून त्याचे डिजिटल फॉरेन्सिक ऑडिट करण्यात यावे. त्याचे व्हॉट्सअॅप चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्स तपासून या रॅकेटमधील अन्य भागीदारांचा पर्दाफाश करावा.

विद्यापीठात भाजपच्या लोकांचा सुळसुळाट आणि डेटावर ताबा

रोहित पवार यांनी विद्यापीठाच्या अंतर्गत कारभारावर आणि तिथे कार्यरत असलेल्या ‘सेक्शन 8’ कंपन्यांवर अत्यंत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. विद्यापीठाच्या मालकीच्या ‘एज्युटेक फाऊंडेशन’ आणि ‘रिसर्च पार्क फाऊंडेशन’ अशा दोन सेक्शन 8 कंपन्या आहेत. यातील ‘एज्युटेक’ कंपनीकडे संपूर्ण डेटा मॅनेजमेंट आणि सर्टिफिकेट प्रिंटिंगचे नियंत्रण आहे.

भरती प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप

विद्यापीठात सरकारी भरतीसाठी परीक्षा द्यावी लागते; मात्र या कंपन्यांच्या माध्यमातून भाजपच्या विचारांचे आणि राजकीय पार्श्वभूमी असलेले अनेक लोक मुद्दाम भरण्यात आले आहेत. या लोकांचा पदव्या आणि निकालांच्या डेटावर थेट ताबा आहे. भाजपशी संबंधित असलेले पदाधिकारी राजेश पांडे यांचा विद्यापीठातील वावर संशयास्पद आणि मोठ्या प्रमाणावर आहे. विद्यापीठाच्या कामकाजात आणि या कंपन्यांमध्ये त्यांचा नेमका काय संबंध आणि ताबा आहे, याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी थेट मागणी रोहित पवार यांनी केली.

तक्रारदारांवर दबाव आणि धमक्यांचे सत्र

या बोगस पदवी प्रकरणाला वाचा फोडणारे विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते (कदम आणि गायकवाड) यांच्यावर आता दबाव आणला जात असल्याचा धक्कादायक दावा रोहित पवार यांनी केला आहे. प्रकरण मीडियासमोर आल्यानंतर तक्रारदारांना निनामी फोन येणे, त्यांना धमकावणे, लोक घरी भेटायला येणे आणि त्यांचे व्हिडिओ काढण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. यावरून हे रॅकेट किती खोलवर आणि शक्तिशाली आहे, हे स्पष्ट होते.

दोषींवर कठोर कारवाईची मागणी

तक्रारदारांना संरक्षण देऊन या संपूर्ण बोगस पदवी विक्री रॅकेटची पाळेमुळे खोदून काढावीत आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला आहे. “महाराष्ट्रात आता कष्ट करून अभ्यास करण्याऐवजी थेट पैसे देऊन डिग्र्या विकत मिळण्याचे रॅकेट सुरू आहे. पुणे विद्यापीठासारख्या पवित्र संस्थेत राजकीय हस्तक्षेपातून असा प्रकार घडणे अत्यंत दुर्दैवी असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना तातडीने बेड्या ठोकल्या पाहिजेत,” अशी आक्रमक भूमिका रोहित पवार यांनी मांडली आहे.

हेही वाचा…

महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्रीच विकत मिळते!:पुणे विद्यापीठातील बोगस पदवी प्रकरणावरून रोहित पवारांचा शिक्षणमंत्री, मुख्यमंत्र्यांवर निशाणा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात चक्क ७० हजार रुपये घेऊन बोगस डिग्री आणि गुणपत्रक विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विद्यापीठाने एका कर्मचाऱ्याला निलंबित करून पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी विद्यापीठाची अधिकृत ‘प्रेस नोट’ सोशल मीडियावर शेअर करत, “महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्रीच विकत मिळते,” असा घणाघाती आरोप करत राज्याचे उच्च शिक्षणमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. येथे वाचा सविस्तर बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.