Headlines

मिटमिटा झूलॉजिकल पार्कमध्ये 3 हजार वृक्षांची लागवड:वृक्षारोपण सप्ताहाची सांगता; पर्यटन विकासाला चालना




छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत राबवलेल्या वृक्षारोपण सप्ताहाची सांगता मिटमिटा येथील प्रस्तावित झूलॉजिकल पार्क परिसरात ३ हजार वृक्षारोपण करून करण्यात आली. हा सप्ताह २२ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमास महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, गटनेते गणेश लोखंडे, नगरसेवक अब्दुल रशीद खान (मामू), मनपा आयुक्त अमोल येडगे, अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, मुख्य उद्यान अधिकारी डॉ. विजय पाटील, कार्यकारी अभियंता वसंत भोये, तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. हरित महाराष्ट्र आयोगाच्या संकल्पनेतून राज्यातील वनसंपदा आणि वृक्षाच्छादन वाढवण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे हा वृक्षारोपण सप्ताह आयोजित करण्यात आला होता. यावेळी मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांना प्रस्तावित झूलॉजिकल पार्कच्या आराखड्याची, प्रकल्पाच्या विविध टप्प्यांची तसेच सध्या सुरू असलेल्या विकासकामांची सविस्तर माहिती दिली. पार्कच्या उभारणीसंदर्भात विविध बाबींवर चर्चाही करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी झूलॉजिकल पार्क हा शहराच्या पर्यावरणीय समतोलासह पर्यटन विकासासाठी महत्त्वाचा प्रकल्प ठरणार असल्याचे नमूद केले. तसेच, वृक्षसंवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *