![]()
पावसाळ्यात फूटपाथ, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर राहणाऱ्या गरीब, गरजू व निराधार नागरिकांना पावसापासून संरक्षण मिळावे, या उद्देशाने स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने शहरात छत्रीवाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. ‘स्नेहबंध’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. उपक्रमांतर्गत मार्केट यार्ड, आनंदधाम, माळीवाडा, नगर बसस्थानक, स्वस्तिक चौक, दिल्लीगेट तसेच सावेडी परिसरातील फूटपाथ व रस्त्यांवर वास्तव्यास असलेल्या गरजूंना प्रत्यक्ष भेटून छत्र्यांचे वाटप करण्यात आले. ऐन पावसाळ्यात छत्री मिळाल्याने पावसात भिजणाऱ्या निराधार नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंजि. अभिजीत ढाकणे, हेमंत ढाकेफळकर, निखिल नरवणे, प्रतीक डहाळे, स्वयंम बास्कर आणि प्रथमेश राठोड यांनी प्रत्यक्ष सहभागी होत योगदान दिले. ‘स्नेहबंध’चे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे म्हणाले, पावसाळ्यात फूटपाथ आणि रस्त्यांवर राहणाऱ्या बांधवांना पावसाचा मोठा सामना करावा लागतो. अशा गरजू व्यक्तींना आधार आणि सुरक्षितता मिळावी, या भावनेतून आम्ही हा उपक्रम हाती घेतला. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचवणे हाच आमचा उद्देश आहे. भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवले जातील.
Source link
पावसाच्या धारा… ‘स्नेहबंध’चा सहारा:फूटपाथ, रस्त्यांवर राहणाऱ्या गरजूंना भेटून छत्रीवाटप