Headlines

Praniti Shinde Targets Govt Over MH-CET & TET Paper Leak Controversy



देशभरात पेपर लीकच्या घटनेमुळे विविध राज्यांमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले होते. दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांनंतर महाराष्ट्रात देखील MPSC तसेच MH-CET चा पेपर देख

.

प्रणिती शिंदे म्हणाल्या, MH-CET जी आमच्या महाराष्ट्रातील एंट्रन्स एक्झॅम आहे, जसे इकडे संसदेत पेपर लीकवर चर्चा सुरू आहे, तसे तिकडे पेपर लीकच्या घटना उघडकीस येत आहेत. आता MH-CET परीक्षेत असे दिसून आले की ज्यांना 12वीच्या परीक्षेत 40-50 टक्के आहेत, त्याच मुलांनी CET परीक्षा पास केली आहे. यावरून हे स्पष्ट होते की कोचिंग क्लासेसमध्ये पेपर लीक झाले आहेत आणि ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यांनी पेपर विकत घेऊन या परीक्षा पास केल्या आहेत. सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट म्हणजे भाजपच्या नेत्यांच्या मुलांचे देखील नाव पुढे येत आहेत.

शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे

पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, मागच्या वेळेस शिक्षकांच्यासाठी असलेल्या TET चा पेपर लीक झाला होता. खूप मोठे घोटाळे महाराष्ट्रात होत आहेत. रस्त्यांवरील खड्डे वाढले आहेत. तरी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खुश आहेत. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसोबत खूप मोठा खेळ या सरकारने लावला आहे. इथे संसदेत आपण पेपर लीकवर चर्चा करत आहोत आणि तिथे अजूनही पेपर लीक व्हायच्या घटना उघडकीस येत आहेत. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे आणि मुख्यमंत्र्यांनी यावर उत्तर दिले पाहिजे तसेच महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

पेपरलीकवरून विरोधक आक्रमक

दरम्यान, कॉंग्रेसच्या युवा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारला अल्टीमेटम दिले होते. त्यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी पेपर लीकचा मुद्दा उचलून धरला असून, MPSC चा पेपर लीक झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. यावर आयोगाकडून सुद्धा दखल घेतली गेली असून चौकशी सुरू करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *