![]()
वसमत तालुक्यातील जवळा खंदारबन शिवारातील शेतात कत्तलीसाठी ठेवण्यात आलेल्या १९ गोवंश प्रकरणात राष्ट्रवादीच्या उपनगराध्यक्षावर गोवंश कत्तलीचा गुन्हा दाखल करून मोकाका लावावा या मागणीसाठी शुक्रवारी ता. ३१ पुकारण्यात आलेल्या वसमत बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी महसूल प्रशासनाकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. वसमत तालुक्यातील जवळा खंदारबन शिवारातील शेतात वसमत ग्रामीण पोलिसांच्या पथकाने बुधवारी ता. २९ छापा टाकून कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवण्यात आलेली १९ गोवंश मुक्त केली होती. या प्रकरणी गुरुवारी ता. ३० वसमत पालिकेचे राष्ट्रवादीचे (अजित पवारगट) उपनगराध्यक्ष सय्यद इमरान अली याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी जनावरे बांधलेली आढळून आली त्या ठिकाणी चिखल व दुर्गंधी होती. या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाने शुक्रवारी ता. ३१ वसमत बंदची हाक दिली होती. या बंदला वसमत शहरात मोठा प्रतिसाद मिळाला. मोठ्या दुकानांसह पानटपरी, चहाटपरी चालकांनी देखील या बंदमध्ये सहभाग नोंदविला. त्यानंतर हिंदू समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. वसमत शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या मोर्चात मोठ्या संख्येने नागरीक सहभागी झाले होते. यावेळी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे निवेदन सादर करण्यात ाले. यामध्ये सदर गुन्ह्यात हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याने आवश्यक कलमवाढ करण्यात यावी. दोषी विरुद्ध मकोका कायद्यांतर्गत कार्यवाही करून तात्काळ अटक करावी, तसेच पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी गंभीर स्वरूपाचा गुन्हा केल्याने नगरसेवक पदासाठी तातडीने अपात्र ठरवावे अशी मागणी करण्यात आली. भाजपाकडून प्रशासनाला निवेदन वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हयात राजकिय दबाव झुगारून सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपाच्या प्रदेश पदाधिकारी प्रिती जैस्वाल यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे दिले आहे. या गुन्हयातील सर्व रॅकेट, वाहतूक साखळी व आर्थिक व्यवहाराची तपासणी करावी अशी मागणी केली आहे.
Source link
वसमत उपनगराध्यक्षावर गोवंश कत्तलीचा गुन्हा दाखल करा:सकल हिंदू समाजाची मागणी, वसमत बंदला मोठा प्रतिसाद