Headlines

Nitesh Rane Supports Tukaram Mundhe; Targets Sanjay Raut & Congress


अन्न व औषध प्रशासन विभागाचे धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवायांचे समर्थन करत राज्याचे मंत्री नीतेश राणे यांनी त्यांचे मोकळेपणाने कौतुक केले आहे. “तुकाराम मुंढे हे काही वेगळे करत नसून, ते केवळ कायदा, नियम आणि सरकारी निर्णयांचे काटेकोर पालन

.

तुकाराम मुंढे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कामगिरीवर बोलताना नीतेश राणे म्हणाले, प्रशासनात नियमाने काम करणारे अनेक उत्कृष्ट अधिकारी महाराष्ट्रात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारचाही हाच प्रयत्न आहे की सर्वांनी नियमांचे पालन करून काम केले पाहिजे. अशा प्रामाणिक आणि कडक शिस्तीच्या अधिकाऱ्यांमुळेच आज महाराष्ट्राला देशात एक प्रगतशील राज्य म्हणून ओळख मिळाली आहे. मी माझ्या भाषणातून या सर्व अधिकाऱ्यांचे कौतुकच केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत ‘भांडुपचा देवानंद’

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर नीतेश राणे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “संजय राऊत यांनी स्वतःची राजकीय लायकी आणि औकात पाहून वक्तव्ये करावीत. ज्यांच्या पक्षाचे आज महाराष्ट्राच्या राजकारणात कोणतेही अस्तित्व शिल्लक राहिले नाही, जे कधी बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांचे झाले नाहीत; त्यांनी देशाच्या गृहमंत्र्यांवर बोलण्याची हिंमत करू नये. लोकमान्य टिळक कुटुंबाने अत्यंत विचारपूर्वक अमित शाह यांना मान दिला आहे. कुठे टिळक कुटुंबाची उंची आणि कुठे हा ‘भांडुपचा देवानंद’! राऊतांनी आपल्या लायकीचा विचार करूनच पुढे बोलावे,” असा टोला नीतेश राणे यांनी लगावला.

अमित शाहांचा पुणे दौरा; काँग्रेसच्या आंदोलनावर टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान काँग्रेसकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनावर बोलताना राणे यांनी काँग्रेसच्या जुन्या कारभाराची आठवण करून दिली. जंतर-मंतरवर गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी योग्य ती पावले उचलली होती. काँग्रेसला प्रत्येक गोष्टीत केवळ चुकाच काढायच्या आहेत. काँग्रेसच्या सत्ताकाळात ‘नीट’ (NEET) चे पेपर फुटणे असो किंवा आंदोलकांवर अमानुष लाठीहल्ला होणे असो; या सर्व गोष्टींचाही हिशोब द्यावा लागेल. राहुल गांधी ज्या पद्धतीने लोकसभेत वैयक्तिक द्वेष दाखवून भाषणे करत आहेत, त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा नाही, असे ते म्हणाले.

अभिजीत दीपकेला पोलिस संरक्षण देतील

‘कॉकरोच पार्टी’चे प्रमुख अभिजित दीपके यांना आलेल्या धमकीबाबत विचारले असता नीतेश राणे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात कोणालाही धमकी आली असेल, तर त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकार आणि पोलिसांची आहे. त्यांनी मीडियासमोर बोलण्यापेक्षा थेट पोलिस ठाण्यात जाऊन अधिकृत तक्रार नोंदवावी आणि पुरावे द्यावेत. पोलिस नक्कीच योग्य ती कडक कारवाई करतील.”

हे ही वाचा…

तुकाराम मुंढेंना हायकोर्टाचा मोठा दणका:मंत्रालयाचे कँटीन आढळले अस्वच्छ, एफडीएला दिले दोन पर्याय; म्हटले- कायद्यात व्हीआयपी कल्चर नको

मंत्रालयातील कँटीन ‘98 टक्के स्वच्छ असून तिथे साधा एकही कीटक आढळला नाही’, हा अन्न व औषध प्रशासनाने (FDA) केलेला दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या तपासणीत पूर्णपणे खोटा ठरला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार वकिलांच्या पथकाने केलेल्या पाहणीत मंत्रालयाच्या कँटीनमध्ये माश्या, गंजलेले चाकू, फुटलेली लादी आणि ड्रेनेजचे गळते पाणी अशी भयानक अस्वच्छता उघडकीस आली आहे. सविस्तर वाचा…

अभिजीत दीपकेंनी धमकी देणाऱ्याचं एक तरी नाव जाहीर करावं:ते केजरीवालांचे कार्यकर्ते, पंजाबमधील पेपरफुटीवर गप्प का?; भाजपचा सवाल

“कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांनी हवेत आरोप करण्यापेक्षा त्यांना धमकी देणाऱ्या आणि पक्षात येण्याची ऑफर देणाऱ्या एका तरी व्यक्तीचं खुलं नाव जाहीर करावं. ते मूळचे ‘आम आदमी पार्टी’चे कार्यकर्ते असून अरविंद केजरीवाल यांच्या सांगण्यावरूनच ते आंदोलन करत आहेत. जर त्यांच्यात हिंमत असेल, तर त्यांनी पंजाबमधील फार्मसी पेपरफुटीविरोधात आप सरकारच्या विरोधात आंदोलन करून दाखवावं,” असा जोरदार हल्लाबोल भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.